लातुर : (लक्ष्मीकांत मोरे) जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे अतिशय दुर्देवी घटना घडलेली आहे.लग्न सोहळ्यासाठी लांळी खुर्द येथे आलेल्या तीन पाहुण्याकडील मुले अंघोळीला कोल्हापुरी बंधा-यात गेली होती.अंघोळ करत असताना पाय निसटून तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.दि.२७ मे रोजी सकाळच्या वेळी घडली. या तिघांचे मृतदेह शोधण्यास उदगीर येथील अग्निशमन दलाला यश आले आहे.
जळकोट तालुक्यातील लाळी खुर्द येथे दि.२७मे रोजी तुळशीदास तेलंगे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याचे सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते.लग्नाची सर्व तयारी करण्यात आली होती.या विवाह सोहळ्यासाठी तेलंगे कुटूंबियांचे पाहुणे संध्याकाळी दाखल झाले होते.या लग्नासाठी आलेले सगंमेश्वर बंडू तेलंगे (वर १३वर्ष),चिमा बंडू तेलंगे (वय१५वर्ष) रा.चिमेगाव तालुका कमलनगर व एकनाथ हनुमंत तेलंगे (वय १५ वर्ष)रा.निडेबन उदगीर हे तिघे जण अंघोळीला तिरु नदीवर असलेल्या ‌लाळी खुर्द येथील बंधारा येथे गेले.अंघोळ करीत असताना एकाचा पाय निसटला व तो बंधा-यात गेला.यानंतर एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्नात तिघेजण बंधा-यात बुडाले.या बंधा-यात खुप पाणी असल्यामुळे त्यांना वर येता आलं नाही व यातच दुर्दैवी मृत्यू झाला.


दरम्यान सुरुवातीला गावक-यांनी मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण खुप पाणी असल्यामुळे त्यांना मृतदेह बाहेर काढता आले नाही. या घटनेची माहिती तहसीलदार सुरेखा स्वामी यांना देण्यात आली.त्यांनी तत्काळ उदगीर येथील अग्निशमक दलाला पाचारण केले.यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी पाण्यामध्ये उतरुन तिघांचे मृतदेह शोधले.घटनास्थळी जळकोट तहसीलदार सुरेखा स्वामी , पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम,मंडळ अधिकारी सुरेवाड,तलाटी उमाटे, यांनी भेट दिली.ज्या ठिकाणी कोल्हापूरी बंधा-यात मुलं बुडाली होती त्याठिकाणी हजारो नागरिकांनी गर्दी होती.विवाहाच्या दिवसी लाळी खुर्द येथील बंधा-यात बुडून पाहुण्याकडील तिन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे तेलंगे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.यासोबतच संपूर्ण गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *