पाणी अपव्ययाच्या प्रमानात वाढ…
गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील काही भागात अपुरा वा कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची ओरड होत असताना दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात देवरी शहरातील प्रभागाच्या अनेक नागरीकांकडुन दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे दिसत आहे. पाणी भरल्यानंतर नळ बंद करण्याची तसदी घेतली जात नाही. काही जागरुक नागरिकांनी याबद्दल विचारणा केल्यास ‘उन्हाळ्यात घरच्या समोरील रसत्यावर थंड लागावा ’ असा अफलातून सल्ला जेष्ट नागरीकाकडून दिल्याची काही उदाहरणे समोर आली आहेत. यंदा देवरी तालुक्याच्या शिरपुर धरणात मुबलक जलसाठा नसल्याने देवरी शहरवासीयांना पाणी कपातीला सामोरे जावे लागनार आहे. पिण्याच्या पाण्याची खुलेआम नासाडी केली जात असूनही नगरंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाने नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करत कारवाईची भूमिका स्वीकारली पाहीजे.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी देवरी नगरपंचायत विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. देवरी शहरावर पाण्याच्या दुष्काळाचे सावट निर्माण असतानां शहरातील नळ धारकाने पाण्याचा अपव्य टाळन्यासाठी नळाला तोटी बसविण्याची मोहीम तत्परतेने हाती घेतली पाहीजे. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या शिरपुर धरणात या वर्षी असमाधानकारक जलसाठा असल्याने देवरीकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागन्याची सक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरीकाकडुन दररोज होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहीजे. वास्तविक, कोणत्याही परिस्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर होणे अभिप्रेत असते.
जिल्ह्याच्या देवरी शहराला गेल्या काही दिवसांपासून वादळी पावसाचा तडाखा बसत असला तरी मान्सूनचे आगमन वेळेवर होईल याची शाश्वती नाही. पावसाळा लांबल्यास धरणातील पाण्यास तळ गाठण्याला फारसा वेळ लागणार नाही. त्यावेळी काय स्थिती ओढावू शकते, याचा विचार देवरी शहरातील नागरीकानीं केलेला दिसत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, दुष्काळाच्या काळात जी दक्षता घेतली जाते, तशी तसदी यावेळी घेतली पाहीजे अन्यथा देवरी शहर वाशीयावर पाण्यासाठी भटकंतीची वेळ येनार आहे हे शंभर टक्के. सुरळीत पाणी पुरवठा सुरू असतानाही अनेक भागात कमी दाबाने अथवा अपुरा पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार होतात. तर दुसरीकडे ज्यांना मुबलक पाणी मिळते, ते सर्रास पाण्याची नासाडी करतात. नगरंचाय क्षेत्रातील काही नळ धारक पिण्याच्या पाण्याचा अर्निबधपणे वापर करतात. काही नागरी तर पिण्याचे पाणी इतर सर्व कारणांसाठी वापरले जाते. परिणामी नागरीकांचे पाणी भरल्यावरही ‘ओव्हर फ्लो’ होवून पाणी रसत्याने वाहत असल्याचे ठिकठिकाणी पहावयास मिळते. पाण्याचा याप्रकारे अपव्यय करणाऱ्या नागरीकांवर कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
प्रतिक्रीया
देवरी शहराला पाणी पुरविनार्या शिरपुर धरनाची पाण्याची पातळी आटलेली आहे. त्यामुळे देवरी शहरातील ज्या नळधारकानीं नळाला तोटी लावली नाही त्यावर नगरंचायतनी कारवाई करन्याकरीता समिती गठीत केली पाहीजे. सगळ्या नळाला तोटी व मिटर लावन्यात आले तर सगळ्या नळ धारकानां योग्य प्रमानात पाणी उपलब्ध होईल. व समोर येनार असनार्या पाणी टंचाई वर मात करता येईल-आफताब शेख (बांधकाम सभापती नप. देवरी)