गोंदिया : जूनच्या उत्तरार्धात जिल्ह्यासह ग्रामीन भागाचा पारा चाळीशीच्या वर जाऊन पोहोचला आहे. संपूर्ण जिल्हा तापल्याने असहय़ उकाडय़ाने नागरिक हैराण होऊन जाणे स्वाभाविकच आहे. तापमानातील मोठय़ा वाढीबरोबर जील्ह्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एकीकडे तापमान वाढते आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठय़ांमधील पाणी हळूहळू घटू लागले आहे. जुनच्या उत्तरार्धात जीवाची काहिली होणे चालू झाले. साधारण जुनच्या शेवटपर्यंत उन्हाळ्याचे हाल अशाच प्रकारे सहन करावे लागणार आहेत. याचे कारण पावसाळा जुनच्या प्रारंभी नव्हे तर जुनच्या शेवटी सुरू होनार असल्याचा गेल्या काही वर्षातील अनुभव आहे. जुनच्या अखेरच्या आठवडय़ात पाऊस सुरू होईपर्यंत तापमान वाढीच्या आणि घटत्या पाणी संकटाला जिल्ह्यातील अनेक तालुक्यानां सामोरे जावे लागणार आहे.

जुन महिन्याच्या प्रारंभीच निसर्गाने आपले रौद्र रूप दाखवले आणि जिल्ह्याच्या अनेक भागाला हलक्या गारपिटीने झोडपले. एकीकडे चाळीशीच्या वर पारा जाताना दिसतो आहे, तर काही ग्रामीन भागात गारपिटीचा फटका बसतानाही दिसतो आहे. म्हणजे एकाचवेळी कडक उन्हाळा आणि गारपीट असे परस्पर विरोधी ऋतू अनुभवण्यास मिळत आहेत. वर्ष दोन वर्षापूर्वी जिल्ह्याच्या अनेक भागात वारला दुष्काळ होता. जिल्ह्यातील देवरी तालुक्याचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी जोरदार पाऊस झाला. पावसाने अगदी वेळेवर हजेरी लावल्याने बळीराजा आनंदून गेला होता. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मुकाटपणे सहन करण्याखेरीज शेतक-याच्या हाती काहीच नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.
देवरी शहरातील पाणी कपातीच्या संभाव्य संकट
तापमानाचा पारा सतत वेगाने वाढू लागल्याने शिरपुर धरणांमधील पाणीसाठय़ांमध्ये मोठी घट होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. शिरपुरधरणसारख्या देवरी शहराची तहान भगवणा-या अवाढव्य धरणात जुन च्या सुरूवातीला अवघा दहा टक्के उपयुक्त साठा असल्याचे सांगितले जाते. शिरपुरधरनसारख्या धरणात एवढा अल्प पाणीसाठा असेल तर या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरांमधील नागरिकांना पाणी कपातीच्या संभाव्य संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.
मान्सूनचे आगमन जूनच्या अखेरीला
तापमानाचा पारा अशाच गतीने वाढू लागला तर धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होणार आहे. तापमानाचा पारा वाढला की, धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने सुरू होते. जिल्ह्यातील लहान मोठय़ा बोर, विहीरी, नदी, नाले , धरणातील पाणीसाठा जूनच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत पुरवायचा आहे. याचे कारण गेल्या काही वर्षात मान्सूनचे आगमन जूनच्या अखेरीला असा अनुभव आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर धरणात पाणी साठण्याला वेळ लागत असतो. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालीका, नगरपंचायतीवर पाणी जपून वापरण्याचे आव्हान करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या काळात पिण्याचे पाणी पुरवण्याला प्राधान्य दिले जाते. दर वर्षी पाण्याची टंचाई जाणवत असूनही त्यावर उपाय काढणे जिल्ह्यातील सत्ताधा-यांना आणि प्रशासनाला जमलेले नाही. पाणीटंचाई दूर करण्याच्या नावाखाली पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करन्याचे आव्हान करन्यात येते.
दरवर्षी नळ योजने करीता लाखो रुपये खर्च :
दरवर्षी नळ योजने करीता लाखो रुपये खर्च केले जातात. तर दुसरी कडे ग्रामीण भागात उन्हाळा सुरू झाला की, टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणी ग्रामीण भागातून सुरू होते. टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला तरी ग्रामीण भागात टँकरने पाणी मिळते, असे नाही. अनेकदा टँकरने केला जाणारा पाणीपुरवठा हा कागदोपत्रीच असल्याचे जिल्ह्यात दिसते.