गोंदिया : मोदी सरकारच्या यशस्वी आठ वर्षातील काळामध्ये केलेल्या लोकोपयोगी योजना, केलेल्या कामाचा पंधरवाडा देवरी तालुका भारतीय जनता पक्षातर्फे साजरा करण्यात आला. या प्रसंगी गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात लसीकरण कार्यक्रम घेत कोरोना महामारीत जीवतोड मेहनत घेणाऱ्या आशा स्वयंसेविका, नर्सेस, डॉक्टर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत त्यांचा मनोबल वाढविण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार संजय पुराम, सभापती अंबीका बंजार, उपसभापती अनिल बिसेन, सदस्या शामकला गावळ, नितेश वालोदे, डॉक्टर नंदनी रामटेकर, डॉक्टर बडवाईक व आरोग्य कर्मचारी उपस्थीत होते.


डॉक्टर, परिचारिका यांचा सन्मान म्हणजे सेवाधर्माचा सन्मान असून कोरोनाच्या अतिशय कठीण काळात सामाजिक बांधिलकी या नात्याने कोविड योद्ध्यांनी केलेल्या कार्याच्या सन्मानार्थ कोरोना काळात जनतेची दिवसरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांचा माजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कोविड संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कोरोना योद्ध्यांचे योगदान मोठे असून स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवाची पर्वा न करता ही लढाई न डगमगता ते लढत होते. महामारीत आपल्या जिवाची पर्वा न करता ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचे कर्मचारी सतत काम करीत असतात. अन्य विभागापेक्षा आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा कोरोना रुग्णांशी व त्यांच्या कुटुंबांशी सतत संपर्क असतो. हिच नेमकी संधी साधून केंद्र सरकारच्या आठ वर्षापूर्तीनिमित्त देवरी तालुका भाजपाच्यावतीने गावखेड्यात काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती
पी. डी. बोरकर, एस. एस जोराडे, एस. एस. थोटे, सी. डी. पटले, ए. आर. शंभरकर, के. एन.ढोमने, एम. व्ही. नखाते, नम्रता मंगले, एस. आर. अहीर, व्ही. वाय. गिलोरकर, के. डी. मेश्राम, एस. एन. खेडकर, पि. के. खान, शारदा शहारे.
प्रतिक्रिया-
भारताचे पंतप्रधान नरेन्द्रं मोदी यांच्या आठ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीचा उत्सव म्हनुन. देवरी तालुक्यातील आशा सेवीका, नर्स व डॉक्टरांचा सत्कार भारतीय जन्ता पार्टी तर्फे करन्यात आला आहे.
संजय पुराम( माजी आमदार)
प्रतिक्रिया –
पहिल्यादांच कुन्या पक्षातील जनप्रतीनीधिनीं आशा सेवीका , नर्स व डॉक्टराचां ऐका सोबत सत्कार केला आहे. या सत्कारामुळे सतत आरोग्य सेवा पुरविनार्या सर्व अधिकारी कर्मचार्यांचा मनोबल वाढेल व काम करन्यास उत्साह निर्मान होईल.
डॉ. नदंनी रामटेकर (आरोग्य अधिकारी )