चंद्रपूर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र ऊर्जानगर आणि जिल्हा गुणवंत कामगार संघटना चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ०५ जून जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रम कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देवराव कोंडेकर राज्य सह खजाणीस तथा जिल्हाध्यक्ष तर प्रमुख अतिथी अख्तर खान गुणवंत कामगार असोसिएशन कार्याध्यक्ष चंद्रपूर ,प्रमुख वक्त्या ज्योत्सना निमगडे, मार्गदर्शक दिनकर मशाखेत्री यांची उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांचे स्वागत वृक्ष देऊन करण्यात आले.
जागतिक पर्यावरणाचे औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.प्रमुख वक्त्या निमगडे यांनी पर्यावरण विषयी सविस्तर माहिती सांगुन आधुनिकीकरणामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम यावर सविस्तर माहिती दिली तसेच प्रमुख मार्गदर्शक दिनकर मशाखेत्री यांना काही वर्षांपूर्वी प्रथम पारितोषिक मिळालेले वाक्य आठवतात ” जलप्रदूषण, वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण आणि भुप्रदुषनापासुन वाचवा वसुंधरा कमीत कमी पाच झाडे लावून त्यांचे संवर्धन करा” असे सुचविले.
यावेळी अख्तर खान ,खेमदेव कन्नमवार,सुभाष शेडमाके, संतोष ताजने यांनी पर्यावरणावर माहिती दिली.अध्यक्षीय मनोगतात देवराव कोंडेकर यांनी वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत त्याच्यावर उपाययोजना करण्यासंबंधी माहिती दिली.नुकताच गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त संतोष ताजने यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मोहना खोब्रागडे संचालिका कामगार कल्याण केंद्र यांनी केले तर आभार सुवर्णा उपरे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीकरिता केंद्राचे कर्मचारी मोहना खोब्रागडे,कविता सदाफळे,सुवर्णा उपरे व गुणवंत कामगार यांनी सहकार्य केले.