उस्मानाबाद : जून महिना आला,पालकांमध्ये आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळेत ऍडमिशन करण्याची होड लागली आहे पण जास्तीत जास्त पालकांमध्ये इंग्रजी शाळांचा कल असलेला दिसून येत आहे. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक,व्यापारी एवढेच काय मोल मजुरी करणारा पालक सुद्धा इंग्रजी शाळेला प्रथम प्राधान्य देताना आढळून येत आहेत.

आज जेव्हा मराठी शाळा की इंग्रजी शाळा ही चर्चा होते तेव्हा ‘माध्यम’वर असलेला फोकस अगदीच चुकीचा असतो. फोकस ‘शिक्षणाच्या दर्जाचं व्हिजन’ हा असायला हवा असे मला वाटते. ज्या इंग्रजी शाळेची इमारत मोठी आहे, सुंदर आहे आणि शैक्षणिक फिस सर्वाधिक आहे तीच शाळा सर्वात भारी हा भ्रम पालकांनी दूर करणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण बिल्डिंग फंड उकाळून बांधलेल्या इमारती शैक्षणिक दर्जा याचा काहीही संबंध नाही.
पालकांत इंग्रजी शाळेची ओढ का.?
पूर्वी इंग्रजी माध्यमाच्या शाळा ग्रामीण भागात तर न्हवत्याच, शाळा होत्या तर जिल्हा परिषद आणि काही खाजगी संस्थांच्या. माझे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच झाले आहे त्यावेळी शाळा याचा अर्थ शिक्षण होता याउलट आता शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा ग्रामीण भागात पाय पसारल्या,सूट बूट टाय असा पोशाख परिधान करून इतरांचे पाल्य इंग्रजी माध्यम शाळांना जाऊ लागले तेंव्हा इतर पालकांत पण आपल्या पाल्याबाबत हौस निर्माण झाली,पण त्यांना हे कुठे ठाऊक आहे.?की त्या इंग्रजी शाळांत शिकविणाऱ्या शिक्षकांचेच आवश्यक शिक्षण,डी एड किंवा बी एड पदवी आहे का..?संबंधित क्षेत्राशी निगडित आवश्यक कौशल्य व अनुभव काय आहे..?वर्षाकाठी हजारो रुपये फिस भरून हौसेने इंग्रजी माध्यम शाळेत केवळ पाठविल्याने आपला पाल्य भविष्यात यशस्वी होणार का..?इतिहास जर पहिला तर मराठी माध्यम विशेषतः जिल्हा परिषद चे विद्यार्थी आयएएस किंवा आय पी एस अधिक प्रमाणात झालेले दिसतील, कारण मराठी(मातृभाषेतून देण्यात आलेल्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्यांमध्ये संकल्पना स्पष्ट होते)मग यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल.?याचा विचार कोनी मुळीच करीत नाही. ज्या घरात कोणाही व्यक्तीला इंगजी बोलता, वाचता येत नाही त्यांनीपन आपले पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलेले उदाहरणे दिसून येतात. आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी शाळेपेक्षा घरात पालक आपल्या पाल्यांना अभ्यासक्रम पूर्ण करून घेत त्यांना अभ्यासाची पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करीत संस्कार देणे अत्यावश्यक असते. याउलट पाल्य केवळ महागड्या शाळेत पाल्य घालून स्वतःला भाग्यवान समजतात हे त्यांचे गैरसमज आहे असे म्हणायला हरकत नाही. ज्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळा आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक बनल्या त्या मानाणे मराठी शाळा तितक्या वेगाने स्वतःला आधुनिक करू शकल्या नाही म्हणून पालकांनी कालानुरूप असणाऱ्या शाळा निवडायला सुरूवात केली.
मराठी माध्यमाच्या शाळांचे भविष्य…
मराठी शाळा टिकवायचा असतील,सर्वसामान्य,गरजू, गरीब कुटुंबापर्यंत चांगले शिक्षण देण्याहेतु शासनाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांकडे जातीने लक्ष दिले पाहिजे. वर्षानुवर्षे त्याच जुन्या इमारती, तुटलेल्या खिडक्या,मोडके दार, जीर्ण अवस्थेतील वर्ग खोल्या.. संडास,वॅशरून ची दुरवस्था अश्या अनेक संकटाच्या घेर्यात अनेक जि प शाळांची दुरावस्था दिसून येते. वेळीच सर्व शाळांची दुरुस्ती करून सर्व शिक्षकांना उच्च दर्जाचे शिकवणी बाबत ट्रेनिंग देण्यात यावे. जेणे करून या शाळेतूनच चांगले विद्यार्थी घडतील यात शंका नाही.आजही कळकळीने शिकवणारे शिक्षक आहेतच. त्यांना नाकारणे वा त्यांचा अपमान करणे हा हेतू अजिबात नाही. परंतु पूर्वी ‘शिक्षक म्हणजे सर्वश्रुत, विचारी, आदर्श व्यक्ती’ हे जे समीकरण होतं तो आज अपवाद होऊन गेला आहे हे कटू वास्तव नाकारून चालणार नाहीच.
प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आठवड्यातुन एकदा जिल्ह्यातील सर्व जि प शाळेस भेट द्यावी अन् शिक्षक व विद्यार्थ्यांशी समोरासमोर चर्चा करून जि प शाळेच्या शिक्षणाचा स्वरूप कसा आधुनिक व उच्च करता येईल यावर भर देणे आवश्यक आहे.ज्या शाळांना संरक्षण भिंत नाही, मुलींच्या संरक्षनाच प्रश्न निर्माण होतोय अश्या अडचणी प्रशासनाने तत्परतेने दूर कराव्यात गरज भासेल अश्या शाळेत एखादा पोलीस कर्मचारी किंवा होमगार्ड सुरक्षेच्या दृष्टीने सेवेत रुजू करावे. असे जेंव्हा बदल घडेल तर इंगजी माध्यमाच्या शाळेतून सर्व विद्यार्थी जि प शाळेकडे आपोआप येतील. कारण मातृभाषेतून शिक्षण हे कधीही उत्तम असते याचे भान शासन प्रशासन राखणे अत्यंत आवश्यक आहे.
सचिन प्रकाशराव बिद्री,📞९५९५९५०००७
उमरगा उस्मानाबाद