उमरगा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सभासद नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली आहे . उमरगा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार दि .१२ रोजी उमरगा येथे जिल्हाध्यक्ष प्रा सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली .

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्त उमरगा येथे मंडप उभारून सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली . तालुक्यात विविध गावामध्ये असे सदस्य नोंदणी कॅम्प आयोजित करून मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली . स्वाभिमानी व्हा , स्वावलंबी व्हा, राष्ट्रवादी व्हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घोषवाक्या प्रमाणे नागरिकांना आवाहन करून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे कार्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेली विविध विकास कामे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभासद नोंदणी करण्यात येत होती .प्रहार संघटनेचे उमरगा तालुका उपाध्यक्ष महेश सोनवणे यांनी यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .

या सभासद नोंदणी अभियानासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, युवक अध्यक्ष शमशोद्दीन जमादार, शहराध्यक्ष सुशील दळगडे, बापू बिराजदार, प्रदीप चालुक्य , गोवींदराव साळुंके ,जगदीश सुरवसे, धीरज बेळंबकर , अॅड . भैय्या शेख, जितेंद्र चौगुले , नंदु जगदाळे, सचिन वाडीकर ,बाबासाहेब सोनकांबळे ,फय्याज पठाण, अप्पु हिप्परगे , वाघंबर सरवदे, सतीश सुरवसे ,संकेत कुलकर्णी, भागवत सोनवणे, युवराज सुरवसे ,पिंटू माळी, विजयकुमार पाटील, व्यंकट बिराजदार, कपील चव्हाण आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते