(सचिन बिद्री, दि22 जुलै)

उस्मानाबाद : भारतीय जनता पक्षाचे लोकसभा सदस्य भगवंत खुबा यांनी नवीन व नूतनीकरणयोग्य केंद्रीय उर्जा राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्री आरके सिंह यांच्या उपस्थितीत भगवंत खुबा यांनी नवीन आणि नूतनीकरणयोग्य उर्जा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्याने देशभरातील शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेच्या पदाधिकार्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून आनंद व्यक्त केला जात आहे.

 शिवा अखिल भारतीय वीरशैव लिंगायत संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे चिटणीस सातलींग स्वामी,लातूर जिल्ह्यातील औस्या चे डॉ .शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी,लिपिक हक्क परिषदेचे अध्यक्ष विजय बोरसे, वीरशैव कक्कया महासंघ समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक खरातमोल आदीनी दिल्ली येथे नुतन ऊर्जा राज्यमंत्री ना भगवंत खुबा यांचा यतोच्छित सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *