औंरगाबाद : गंगापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा लवकरात लवकर भरण्यासाठी गंगापूरच्या तहसीलदार सतीश सोनी यांनी शेतकऱ्यांना 31 जुलै च्या पिक विमा भरण्याची आवाहन केले यावेळी गंगापूर तहसील कार्यालयात मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत तहसील कार्यालय गंगापूर येथे मोबाईल व्हॅन ला हिरवा झेंडा दाखवून प्रचाराची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित तहसीलदार श्री सोनी , नायब तहसीलदार श्री अविनाश अंकुश सर भारतीय कृषी विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी श्री प्रवीण जगताप तसेच गंगापूर येथील शेतकरी उपस्थित होते. या वर्षी पीक विमा भरणा तारीख 31 जुलै शेवट आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळावी व आजच जवळच्या सी एस सी सेन्टर किंवा बँकेतून आपल्या पिकाचा विमा काढून घ्या अशी माहिती पीक विमा प्रतिनिधी श्री प्रवीण जगताप यांनी शेतकऱ्यांना दिली.
प्रतिनधी रमेश नेटके
गंगापूर औंरगाबाद