लातूर : अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे आषाढ पोर्णिमे पासुन वर्षावास प्रारंभ होत असुन त्यानिमित्ताने पुढिल तीन महिने भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगावच्या वतीने ग्रंथ पठन होणार आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे वाचन आषाढ पोर्णिमे पासुन तथागत बुद्ध विहार किनगाव येथे सुरु करण्यात आले

या ग्रंथाचे वाचन आयु करुणा धम्मानंद कांबळे जिल्हा सचिव भारतीय बौद्ध महासभा लातुर यांनी वाचन केले यावेळी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महिला उपासिका करुणा कांबळे सुषमा कांबळे, इंदुमती कांबळे,माया वाहुळे,पंचशीला गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,तर त्रिशरण पंचशील पुजा पाठ बौद्धाचार्य सुनिल कांबळे यांनी घेतले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगावचे अध्यक्ष आयु श्रीमंत कांबळे सर हे होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य धम्मानंद कांबळे,अंकुश वाहुळे ता सरचिटणीस अहमदपूर,नरहारी गायकवाड टि.टि.वाहुळे, सुनिल कांबळे, देविदास वाहुळे,विद्यानंद वाहुळे,आर.के.कांबळे, वैजनाथ गायकवाड,प्रित्तम कांबळे हे उपस्थित होते

यावेळी आषाढ पौर्णिमे निमित्त अंकुश वाहुळे पेंटर यांनी फळे वाटप केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा शाखा किनगाव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, पंचशील मित्र मंडळ, नालंदा मित्र मंडळ, तथागत मित्र मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले
अफजल मोमीन
लातूर जिल्हा ब्युरो चीफ
एन टीव्ही न्यूज मराठी