कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी येथे अमृत महोत्सव दिनानिमीत्य ध्वजारोहण..

गडचिरोली : अहेरी, १३ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी रहावी यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहिम राबविण्यात येत आहे. या या मोहिमेत गडचिरोली जिल्हयातील सर्व नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावून आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले होते.
अमृत महोत्सव दिनानिमीत्य माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक अजय कंकडालवार यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी येथे आज १३ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती अहेरी चे रवींद्रबाबा आत्राम, कर्मचारी महेश गुप्ता सचिव, हेमंत देशमुख सह सचिव, शामराव बोंमनवार लेखापाल, लक्ष्मण रेड्डी चिरलावार निरीक्षक, महेश गददेवार आपरेटर, मयूर गुम्मूलवर लिपीक, तिरुपती अय्याला, लिलादर गोदारी, अंकीत कोरेत, नागेश आत्राम, राजू तालांडे, पेंदाम काका,जीवन तलांडे उपस्थित होते.

सुरेश मोतकुरवार

अहेरी, गडचिरोली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *