गडचिरोली :अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथे आज दिनांक 10.08.2022 रोजी उपविभाग अहेरी अंतर्गत उप पोलीस स्टेशन व्यंकटापूर येथील शासकीय आश्रमशाळा, अवलमारी व जिल्हा प्राथमिक शाळा अवलमारी येथे मा. श्री. अंकित गोयल सा. पोलिस अधीक्षक, गडचिरोली , मा. श्री. सोमय मुंडे सा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) गडचिरोली, मा. श्री. समीर शेख सा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गडचिरोली, मा. अप्पर पोलीस अधिक्षक अहेरी श्री. अनुप तारे सो, यांचे प्रेरणेने व मा. श्री. अमोल ठाकूर सा. उपविभागीय पोलिस अधिकारी,अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत शासकीय आश्रमशाळा, अवलमारी व जिल्हा प्राथमिक शाळा अवलमारी येथील शिक्षक व विद्यार्थ्यांना पोउनि कुकलारे साहेब यांनी महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे व कायद्यातील तरतुदी बाबत नको त्या ठिकाणी कोणी हात लावत असेल किंवा लैंगिक सुखाचा कोणी मागणी करत असेल किंवा लैंगिक छळ करीत असेल तर याबाबत माहिती तुमच्या सरांना किंवा आपल्या आई वडील किंवा पोलिस ठाणेस तक्रार द्यावी अशी माहिती दिली तसेच मोठा प्रमाणात सायबर गुन्हे घडत आहेत याबाबत काय खबरदारी घ्या डेबिट, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, या सुविधा फास्ट आहे पण त्याची खबरदारी नाही घेतली तर आपले अकाऊंट खाली होते त्याकरिता कोणीही OTO नं. किंवा बँकेची पर्सनल माहिती कोणालाही देऊ नाही तसेच ATM, Credit Card वरील नंबर कोनलाही सांगू नाहीत. तसेच फ्लिपकार्ट, अमेझॉन, OLX, फोन पे, गूगल पे वरून ही तुमची फसवणूक होऊ शकते याबाबत ही खबरदारी घेण्याबाबत माहिती दिली तसेच ऍट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी या विषयांवर मार्गदर्शन केले त्याच बरोबर शिक्षणाचे महत्व व स्पर्धा परीक्षेची माहिती, गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या "पोलिस दादरोला खिडकी" च्या माध्यमातून शासनाच्या विविध विकासाच्या योजणा, प्रशिक्षण इत्यादी नागरी उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोउनि काळे साहेब यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम बाबत सविस्तर माहिती दिली.
" स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" या उपक्रमा अंतर्गत भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान वाढवण्यासाठी केंद्र सरकारने सुनिश्चित केलेल्या "हर घर तिरंगा"(घरो घरी तिरंगा) हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत असून या उपक्रमात पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी कुंभार साहेब, पोउनि कुकलारे सा., पोउनि काळे सा., SRPF चे पोउनि काकांनी सा., पोउनि बनसोडे सा. व सर्व पोलिस अंमलदार तसेच शाळेचे शिक्षक, विद्यार्थ्यां व गावातील पोलीस पाटील पागडे, झाडे सरपंच कोडापे,उपसरपंच चिरंजीव, सदस्य, व्यंकटेश्वर मंदिराचे पुजारी, पत्रकार कांबळे गावातील नागरिकांनासह रोड मार्च करण्यात आला असून त्या दरम्यान सर्व नागरिकांना या मोहीम मध्ये सामील होऊन आपण आपल्या घरावर व दुकानासमोर तिरंगा ध्वज 13 आगस्ट ते 15 आगस्ट 3 दिवस लावण्यात यावा, ध्वज लावतेवेळी ध्वज चा अपमान होऊ नये, ध्वज सुव्यवस्थित लावण्यात यावा असे आव्हान करण्यात आले. तसेच सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थे चा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या.
तसेच पो. शि.नांदे यांनी शाळेचे शिक्षक, विद्यार्थ्यांना उप पोलिस स्टेशन येथे बोलावून पोलिस स्टेशन च्या दैनंदिनी कामकाज व गुन्हासंबंधी पो.हवा. वडेटीवार, शस्त्रे बाबत पो.हवा.सडमेक मेजर, सिविक अँक्शन,DSB बाबत पो.हवा. तोरे मेजर, बारणीशी बाबत पो.हवा. कुंबरे मेजर, पोलिस कोठडी बाबत पो.हवा.धकाते मेजर, डायल 112 बाबत म.पो. शि. वरगंटीवार मॅडम, वायरलेस बाबत ना. पो. शि. गेडाम मॅडम यांनी सविस्तर माहिती दिली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यकामी सपोउनि नैताम, पो.हवा. साव, तोडासे, गावडे, ना.पो. शि. पुगाटी, म.पो. शि.अत्राम मॅडम, पो. शि.कुंभरे, म.पो.शि चेतना कुंबरे, हलामी मॅडम, तसेच सर्व जिल्हा व SRPF चे पोलीस अंमलदार यांनी सहभाग नोंदविला.
सुरेश मोतकुरवार
अहेरी, गडचिरोली