सांगली ,राहुल वाडकर .
सांगली : इंडोनेशियाची राजधानी बाली येथे झालेल्या पुरुषांच्या सौंदर्य स्पर्धेत तासगाव येथील आशिष शिंदे याने बाजी मारली. मॅन ऑफ द ईअर किताब जिंकला. सांगली जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातील तरुणाने भारतीय तरुणांचे सौंदर्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पराक्रम केला.स्पर्धेत २० हून अधिक देशांतील तरुण स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेत वेगवेगळ्या आठ फेऱ्या झाल्या. व्यक्तिगत मुलाखत, राष्ट्रीय वेशभूषा, कॅज्युअल वेअर, पोहण्याचा कॉस्च्युम, बौद्धिक चाचणी, अशा विविध फेऱ्यांमध्ये आशिषने चमक दाखविली. त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा परीक्षकांवर पडला. त्यातून तो बेस्ट फाइव्ह (सर्वोत्कृष्ट पहिले पाच)मध्ये निवडला गेला. त्यामध्येही त्याने बाजी मारली. शिवाय भारतीयांनी ऑनलाइन स्वरूपात दिलेल्या मतांचाही भरभक्कम पाठिंबा मिळाला. परीक्षकांनी ‘मॅन ऑफ ईअर एशिया २०२२’ पुरस्कारासाठी त्याची निवड केली.आशिषने यापूर्वी ‘रॉयल फेस ऑफ इंडिया’ आणि ‘रॉयल महाराष्ट्र’ पुरस्कारही पटकावले आहेत. नोकरी- व्यवसायाच्या पारंपरिक मार्गापेक्षा हटके क्षेत्रात करिअर करण्यासाठी सध्या तो पुण्यात राहत आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. मॉडेलिंगच्या वाटचालीत आई-वडिलांचा भक्कम पाठिंबा मिळत गेला आहे. स्पर्धेसाठी आशिषला ग्लोबल मॉडेल इंडियाचे अमर सोनावणे, मयुरेश अभ्यंकर आदींनी मार्गदर्शन केले.