(सचिन बिद्री:उमरगा)
उस्मानाबाद : गेल्या काही महिन्यांपासून उमरगा तालुक्यात राजरोसपणे कर्नाटकातील अफजलपूर व शहापूर येथील वाळू अवैधरित्या चोरट्या मार्गाने तालुक्यातील काही माफियांतर्फे वाहतूक होत आहे पण यावर उमरगा महसूल विभागाला अंकुश आणण्यात अपयश येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे यावरून वाळू माफियांची उमरगा महसूल विभागावर दहशत निर्माण झाली आहे की काय..? याबाबत सर्वसामान्य जनतेतुन चर्चा रंगताना दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी उमरगा तहसीलदार राहुल पाटील अवैध वाळू वाहतूक बाबत लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या कचाट्यात रंगेहाथ अडकले, त्याबाबत तहसीलदारांना सुरुवातीला पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान उमरगा तालुक्यात सर्रासपणे अवैध गौंनखनिज वाळू तस्करी सुरूच असल्याचे दिसून येत आहे. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना याबाबत कल्पना देऊनही काहीच ठोस पाऊल उचलले जात नसल्याचे शिक्षित तथा जाणकार जनतेतून अश्या चर्चा होत आहेत,तेंव्हा नेमकं या वाळू माफियांना खंबीर साथ कोणाचे लाभत आहे..?हा प्रश्न निर्माण होत आहे. काही वाळू वाहतूक करणारे व्यापारी आपल्या गाड्यावर प्रेस असे लिहून पत्रकार असल्याचे भासवून महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात वाळू घालत असल्याबाबत चर्चा रंगताना दिसून येत आहेत.
शासनाचा हक्काचं महसूल सर्वांच्या डोळ्यादेखत पाण्यात घालून,चिरीमिरी घेत अश्या वाळू माफियांना पाठीशी घालणे महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठेपणा वाटत असेल का..?असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. उमरगा शहरातील उमरगा नदीवरील पुलापासून दत्त मंदिर पर्यंत जवळपास आठ(8) बांधकाम साहित्य विक्री दुकानासमोर वाळुंचे ढिगारे सजलेले आहेत, या दुकानासमोर काळी आणि लाल असे दोन्ही रंगाच्या वाळू ग्राहकांना दाखविण्यासाठी सॅम्पल स्वरुपात ठेवण्यात आले आहेत. दररोज जवळपास 7 ते 8 वेगवेगळ्या गाड्या उमरगा शहरातून अवैध रित्या वाळू वाहतूक करताना दिसून येतात.दररोज सायंकाळी 8 वाजल्यापासून पहाटे 7 पर्यंत अश्या गाड्या शहर व परिसरात आढळून येत आहेत पण यावर अंकुश आणण्यासाठी किंवा महसूल वसुली करीता महसूल विभाग मात्र झोपेचे सोंग घेत आहे का..?असा सवाल जनतेतून विचरला जातोय.शहरातल्या ज्या दुकानासमोर वाळुंचे ढीग आहेत यांची महसूल विभाग चौकशी करणार का..?शासकीय रॉयल्टी भरलेल्या पावत्या कोणाकडे आहेत किंवा नाहीत याची तपासणी करणार का..?हे आता पाहण्याजोगे ठरणार आहे.चिरीमिरी आपल्या पदरात गोळा करत ‘तेरी भी चूप मेरी चूप’ हे वाक्य महसूल विभागाला गालबोट लागनार आहे.
वाळू माफियांसोबत अर्थिक देवाणघेवाण साधत अर्थिक संबंध ठेवणे घातक ठरू शकतो हे आता तरी प्रशासनाला कळून चुकले असावेत अशी चर्चा सुशिक्षित तथा जागरूक नागरिकांतून होत आहे.
एखादा टिप्पर ताब्यात घेऊन चौकशीनंतर गुन्हा दाखल झाला तर महसूल बुडवून अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या सर्व वाळू माफियांवर चोप बसेल.प्रशासनाचा धाक निर्माण होईल परिणामी शासनाच्या तिजोरीत महसूल जमा होईल.केवळ शासकीय कामासाठी वाळू वापरण्याची परवानगी दिलेली असताना,काही टिप्पर, वाळू माफिया शासकीय काम सोडुन भलतीकडेच वाळू टाकायचा गोरख धंदा बंद होण्यास मदत होईल
गुजरातची वाळू
एकाच रॉयल्टीच्या आधारे वाळूची अनेक वेळा वाहतूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत असल्याचे काही स्थानिकांनी सांगितले.पण या गाड्यांची कसून चौकशी करण्यासाठी शासनाच्या तिजोरीत महसूल वृद्धीसाठी पुढाकार घ्यायला कोणी समोर येत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.