मा.राज्यमंत्री बच्चू कडू यांची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी एका 6 चिमुकलीवर संतोष पोपट वडणे नामक नराधमाणे बलात्कार करून मुलीच्या गुप्तांगावर वार केले होते,सदर मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हाभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान राज्य महिला आयोगाच्या रुपालिताई चाकणकर यांनीही प्रत्यक्ष पीडितेची भेट घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याबाबत मागणी केली आहे.
दि 2 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे माजी राज्यमंत्री तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याबाबत मागणी केली आहे.
पत्रामध्ये मजकूर आहे की,संतोष पोपट वडणे हा रा. माळूब्रा ता.
तुळजापूर जि.उस्मानाबाद ( धाराशिव) येथील रहिवाशी असून ते सद्यास्थितीमध्ये कारागृहामधून पेरोल
रजेवर आहे. त्याने तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ या गावात ६ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन
मुलीच्या गुप्तांगावर वार केल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमुळे शरीरामधून जास्त प्रमाणात
रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे
उपचार सुरू आहे. सदर आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संतोष
पोपट वडणे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने सदर प्रकरण
जलद गती न्यायालयामध्ये चालवून आरोपीला कठोर शिक्षा मिळणेबाबत विनंती करण्यात आली आहे. सदर प्रकरणांत नियमानुसार कारवाही करून सदर प्रकरण जलद गती न्यायालयामध्ये चालवून आरोपी संतोष पोपट वडणे रा. माळूब्रा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद ( धाराशिव ) ह्याला
कठोर शिक्षा देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.
कोणीही वकीलपत्र स्वीकारणार नाही
दरम्यान उस्मानाबाद जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अँड सुधाकर मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली 1 सप्टेंबर रोजी जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या सदस्यांची बैठक घेऊन सर्वांनी सदर बलात्काराच्या घटनेचा निषेध नोंदविला आणि सर्व विधिज्ञांच्या सूचनेनुसार सर्वानुमते घटनेतील आरोपीचे वकीलपत्र न स्वीकारण्याचे ठराव मंजूर करण्यात आले आहे.
सचिन बिद्री