ऐका महिन्यात दोन घटना..
गोंदिया : शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरीत्या व्हावी व लाभार्थींना लाभ घेता यावा, यासाठी गोंदिया जिल्ह्य़ातील आदिवासी बांधवांसाठी देवरी येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यात आले. जिल्ह्य़ातील आदिवासीं विद्यार्थ्यांच्या वस्तीग्रुहाची देखरेख प्रकल्प कार्यालयाची असते, पंरतु सतत विद्यार्थांवर येत असलेल्या प्रसंगामुळे प्रकल्प कार्यालयाच्यां वस्तीग्रुहातील शिक्षकावर वचक कुनाचे हा प्रश्न निर्मान होत आहे. जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, गोंदिया जिल्ह्य़ासाठी देवरी येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत सतत वस्तीग्रुहातील विद्यार्थांच्या समस्सेत वाढ होत असुन ऐकाच महिन्यात दोन मोठ्या घटनेला देवरी प्रकल्प कार्यालयाला समोरे जावे लागले आहे.

त्यात बोरगाव/बाजार आदिवासी आश्रम शाळेतील ८ विद्यार्थीनींच्या तब्बेतीत अचान बिघाड झाल्याने त्यानां देवरी ग्रामीन रु्नालयात दाखल करन्यात आले होते. त्यावर अनेकांनी अंदाज वर्तवत विद्यार्थीनींना जेवनातच विषबाधा झाल्याचे अंदाज वर्तविले होते. त्यावर देवरी ग्रामीन रुग्नालयाच्या डॉक्टरानीं व बोरगाव/बाजार आश्रम शाळेतील शिक्षकानीं नागरीकानीं वर्तविलेले अंदाज फेटाळत, डोकेदुखी, मळमळ व ताप ही लक्षणे विद्यार्थ्यांना दिसून आल्याने त्यानां रात्री दरम्याने देवरी ग्रामीन रुग्नालयात भरती केल्याचे सांगीतले. हिही घटना याच महिन्यात घडली होती.

त्यातच चार दिवसा अगोदर जिल्ह्यातीलच आदिवाशी शाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची घटना घडली. त्यातशाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: काही विद्यार्थी- विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या होत्या. गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आले व ट्रकमध्ये ज्या 120 मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी होत्या. विशेषता या सर्व विद्यार्थानां कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जाण्यात आलं होतं. तिथून परतत असताना हा प्रकार घडला होता. तातडीन सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होत. यावर प्रकल्प अधिकारी यानीं दोन शिक्षकानां निलंबित करुन पालक मंत्र्यानीं या प्रकरनी चौकशीचे आदेश दिले आहेत.या सततच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळेतील घडत असलेल्या प्रकरनामुळे प्रकल्प विभागाच्या वसतीग्रुहातील कार्यप्रनालीवर प्रश्न चिन्ह निर्मान केल्या जात आहे.