औषध फवारणी बिनकामी…

गोंदिया (देवरी):-
देवरी शहर व परिसरात डासांचे साम्राज्य वाढले आहे. यामुळे देवरीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डासांना नष्ट करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनातर्फे केली जाणारी औषध फवारणी बिनकामी असल्याचे स्पष्ट झाले आहे. फवारणीमध्ये औषध कमी व पाणी जास्त वापरले जात असल्याने डासांचे साम्राज्य शहरात कायम आहे. देवरी शहरात दोन वर्षापासून करोनामुळे अनेकांचा बळी गेला.

करोनाचे सावट कमी झाले असताना डासांचा त्रास सुरू झाला आहे. डासांच्या त्रासामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी तापाचे पेशंट वाढत चालले आहे. नगरपंचायत प्रशासनाला याची कल्पना असतानाही नगरंचायत प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली गेलेली नाही. गेल्या महिन्या भरा अगोदरच देवरी शहरामध्ये नगरपंचायतच्या आरोग्य विभागाकडून औषधांची फवारणी केली गेली आहे. मात्र औषध फवारणी करून ही स्थिती ‘जैसे -थे’ आहे. या फवारणी मध्ये औषधापेक्षा पाणी जास्त वापरले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.

नगरपंचायतच्या आरोग्य विभागाने औषधाचे प्रमाण योग्य पद्धतीने वापरावे तरच शहरातील डासांची संख्या कमी होईल असे नागरिकांचे म्हणणे आहे. देवरी शहरातील अनेक ठिकानी नालि स्वच्छता राखली जात नसल्याने तेथेही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. स्वच्छतेच्या नावाखाली टिमक्या वाजवत फिरणार्‍या नगरपंचायत विभागाच्या कर्मचार्‍यांना देवरी शहरातील डासांनी उच्छाद मांडल्याचे दिसत नाही का? असा सवाल नागरिकांमधून आता विचारला जात आहे. नगराध्यक्ष संजु ऊईके यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून शहरातील डासांचा प्रादुर्भाव कमी होईल यासाठी प्रयत्न करावे, अशे आदेश नगरपंचाय प्रशासनाले दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *