गौतम अदानी यांची कंपनी अदानी एंटरप्राईजेसचे शेअर 25 टक्क्यांनी कोसळले आहेत. जवळपास 4800 रुपयांचा असलेला एक शेअर घसरून आता 1505 रुपयांवर आला आहे.
तर अदानी पोर्ट्स आणि अदानी स्पेशल इकोनॉमिक झोनचे शेअर 18.75 टक्क्यांनी गडाडून आता 762 रुपयांवर आले आहेत.
यामुळे देशातल्या दुसऱ्या सर्वाधिक श्रीमंत माणसाच्या म्हणजेच गौतम अदानींच्या संपत्तीमध्ये कमालीची घट झाली आहे.