‘दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. पाच मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत, त्या त्यांच्या हातात आहेत, त्यांनी लवकर त्या मार्गी लावाव्यात,’ असं संभाजीराजेंनी म्हटलंय.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज (14 जून ) खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती भेटले.
पुण्यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीनंतर उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.