जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास नसेल, तोपर्यंत तुम्ही ईश्वरावरही श्रद्धा ठेवू शकणार नाही”- विवेकानंद
रुमीच्या कवितांपासून ते नीत्शे, विवेकानंदांचं तत्त्वज्ञान समजून घेण्याची ज्याला जिज्ञासा होती, ती व्यक्ती कशी असेल हा विचार येतो. या सगळ्या पोस्टस त्याच्या ट्विटर हँडलवर मी अनेकदा शोधून शोधून वाचल्या आहेत.
एखाद्या कलाकाराला बनवता बनवता तत्त्वज्ञ, वैज्ञानिक तसंच एखाद्या स्वैर प्रवाशाचा अंशही विधात्याने सुशांतमध्ये घातला होता.