
जवळजवळ 650 वर्षे निजामी राजवटीच्या हैदराबाद मुक्ती संग्राम विरुद्धचा लढा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नव्हता तर तो स्वातंत्र्याचा लढा होता, लोक लढा होता.या मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात रुजला आहे. हजारो लोकांना प्राणांची आहुती द्यावी लागली.कुटुंब पोरकी झाली. यामध्ये आपले पूर्वज आहेत.याची जाणीव पुढच्या पिढीला झाली तरच स्वातंत्र्याची खरी फळे येणाऱ्या पिढीला चाखता येईल. असे प्रतिपादन इतिहास संशोधक विवेक सौताडेकर यांनी केले.

शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र,उस्मानाबाद अंतर्गत स्वातंत्र्याच्या अमृत वर्ष निमित्त हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि मराठवाडा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्याचा इतिहास युवकापर्यंत पोहोचवण्याच्या प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान उस्मानाबाद जिल्हा केंद्राचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी मुक्ती संग्राम लढ्यात अनंत अडचणीवर मात करीत आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. हा इतिहास आहे. त्याला भवितव्य आहे.असे प्रतिपादन केले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान उस्मानाबाद जिल्ह्य उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख,श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ घनश्याम जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यकारिणी सदस्य डॉ. स्मिता शहापूरकर यांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान स्मरण करणे ही विद्यार्थ्यांची कर्तव्य आहे त्याचे पालन करावे. असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई जिल्हा केंद्र उस्मानाबाद कार्यकारिणी सचिव बालाजी तांबे कार्यकारी सदस्य सुरेखा जगदाळे ,
डॉ. तबस्सुम सय्यद, प्रदीप चालुक्य, डॉ. संजय अस्वले यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारिणी सदस्य डॉ. रमेश दापके सूत्रसंचालन डॉ. संजय अस्वले पाहुण्यांचा परिचय डॉ. डी व्ही थोरे आणि आभार प्रदर्शन प्रदीप चालुक्य यांनी केले.
सचिन बिद्री : उमरगा