(सचिन बिद्री:उमरगा)
उस्मानाबाद : तालुक्यातील कोरेगाव जि. प.शाळेत माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.सर्वप्रथम डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन गावच्या सरपंच राजश्री प्रेमनाथ सूर्यवंशी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वजीत,उपाध्यक्ष अविनाश कांबळे,सदस्य वैजनाथ सूर्यवंशी,महेश खटके, केंद्रप्रमुख प्रकाश मुळे, अश्विनी वाघमोडे, मुख्याध्यापक प्रवीण स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती शाळेतील सहशिक्षिका लक्ष्मी वाघमारे व अशोक बिराजदार यांनी दिली.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो याचे औचित्य साधून शाळेतील विविध पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन विश्वजीत खटके व सरपंच राजश्री प्रेमनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले.
शाळेच्या ग्रंथालयातील उपलब्ध असलेली पुस्तके उपस्थित पालकांना वाचण्यास देण्यात आली.ग्रंथालयाचा उपक्रम पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.वाचन प्रेरणा दिनासोबत जागतिक ‘हात धुवा’ दिन असल्याने विद्यार्थ्यांच्या वतीने हात धुण्याचे प्रात्यक्षिक पालकांकडून व उपस्थित पदाधिकारी कडून करून घेण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक उमाचंद्र सूर्यवंशी यांनी केले.तर कार्यक्रमासाठी शाळेतील अनेक पालक यावेळी उपस्थित होते.