(सचिन बिद्री:उमरगा)
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उमरगा आगार प्रमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले की, तालुक्यातील कसगी हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर महाराष्ट्र राज्यातील शेवटचे टोकाचे गाव असून,कसगी गावातील जवळपास 70 ते 80 विद्यार्थी शिक्षणासाठी गुंजोटी आणि उमरगा येथील शाळा व महाविद्यालयात येत असतात यामध्ये मुलींची संख्या सर्वाधिक आहे पण गावातून शिक्षणासाठी येण्यास एस टी नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा व महाविद्यालयाला जाण्यासाठी व परत आपल्या गावी येण्यासाठी वेळेवर एस टी बस नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होत असल्याबाबत खंत व्यक्त कारण्यात आली आहे.तत्परतेने उमरगा आगारामार्फत उमरगा आळंद ही बस सेवा सुरु करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे व विद्यार्थ्यांना आपल्या गावी परत येण्यास होणारे त्रास थांबवावे अशी विंनती या निवेदनात करण्यात आली आहे.सदर बस सेवा सुरु न झाल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
सदर निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष सचिन माने,तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार,तालुका उपाध्यक्ष किरण कसगीकर, अंनत कुमार कांबळे, नेताजी गायकवाड, अविनाश गारगोटे, काशिनाथ गायकवाड, प्रकाश कांबळे आदी पदाधिकारी यांच्यासह जवळपास 60 विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत