सचिन बिद्री:उस्मानाबाद

उमरगा तालुक्यातील डाळिंब शिवरात शेतकरी हरिदास निवृत्ती लाळे यांच्या 6 शेळ्या व बिभीषण सोपान लाळे यांच्या दोन अश्या एकूण 8 शेळ्या सोयाबीन च्या रानात चरत असताना,एकाएकी वीज पडल्याने सर्व जागीच दगवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
गुरुवार दि 20 अक्टोम्बर रोजी साधारणतहा दुपारी 4 वाजल्याच्या सुमारास डाळिंब मंडळात पावसाची रिमझिम सुरु झाली,आकाशात विजांचा कडकडाट होत होता,यावेळी शेतकरी हरिदास लाळे आणि बिभीषण लाळे यांचे आठ शेळ्या,शेजारीस असलेल्या शेतकरी शाहूराज सोनकटाळे यांच्या सोयाबीन च्या शिवारात(गट क्रमांक 281 मध्ये )चरत होत्या, सर्व शेळ्या जवळच्या अपट्याच्या झालाखाली थांबलेल्या असताना अचानक वीज कोसळळी आणि सर्व आठ शेळ्या जागीच मयत झाल्या. यामध्ये 6 मोठ्या शेळ्या व 2 पिल्ले असल्याची माहिती भेटली असून 3गाभण शेळ्या असल्याबाबत शेतकऱ्यांकडून माहिती प्राप्त झाली आहे.


दरम्यान पशुवैद्यकीय अधिकारी आणि महसूल अधिकारी यांनी घटनास्थळी दाखल होत पंचांनामा केला असल्याबाबत डाळिंब सज्जा तलाठी गजेंद्र पाटील यांनी सांगितले.
अचानक होत असलेल्या या परतीच्या पावसामुळे शेतक-याची मोठी धावपळ उडत असून,काढनीला आलेले सोयाबीन बऱ्याच ठिकाणी जागेवरचं नासाडी होतय तर काही शेतात गुडाघाबर पाणी साचल्याने काढणी अशक्य झाली आहे.अनेक ठिकाणी शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेले तर मागील काही दिवसात शेतक-यानी काढलेल्या सोयाबीनच्या गंजी लावून ठेवल्या होत्या या गंजी खाली पाणी गेल्याचेही चित्र दिसून येत आहे.त्यामुळे शेतक-यांची काढलेले व काढत असलेले सोयाबीनचे प्रंचड नुकसान झाले आहे .एकूणच या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यात विजेच्या कडकडाटात पशूधनाची जीवित हानी झाल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार की नेहमीप्रमाणे कडवत..? हा प्रश्न निर्माण झालाय..!शेताकऱ्यांना नुकसानाची भरपाई दीपावली पूर्वी भेटली तर नक्कीच दिवाळी गोड होऊ शकते हे ही तितकेच खरे.त्या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा/कर्मचारी तत्परतेने कामाला लागले असल्याचेही दिसून येत आहेत.
[6:24 pm, 20/10/2022] Umrga Sachin Bidri: Blog 👆🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *