
उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दि.२० वार गुरुवार रोजी सास्तुर ता.लोहारा येथील निवासी दिव्यांग अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी फराळ,आकाश कंदीलसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग अनाथ विद्यार्थी दिवाळी सणाच्या आनंदापासून वंचित राहू नये हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी सांगितले.
दिव्यांग अनाथ मुलांना नवचैतन्य व त्यांच्या जिवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जिवन प्रकाशमय होऊन इतरांप्रमाणे त्यांनीही दिवाळी सण साजरा करुन आनंद घ्यावा यासाठी लोककल्याण संस्थेच्या वतीने गेली ४ वर्षे झाली हा उपक्रम राबविला जातो.
या दिवाळी फराळ व साहित्य वाटप उपक्रमासाठी संस्थेचे सचिव रवि दासमे,माजी सैनिक बब्रुवान सुरवसे,संस्था अध्यक्ष विक्रम दासमे,अमोल सुरवसे, बालाजी हालगरे,शिवकंठ पाटील संघर्ष कांबळे,शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.नादरगे,शिक्षिका अंजली चालवाड,एस.जे.शिंदे,डी.एस.माने,प्रयाग पावळे,सुनिता कज्जेवाड,शंकरबाबा गिरी, भिमराव गिर्दवाड आदी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.