उस्मानाबाद : आपल्या वाढदिवसाला होणारा अवांतर खर्च टाळून जि प शाळेत शिकणाऱ्या, वडिलांचे छत्र हरवलेल्या,अत्यंत हुशार पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या इयत्ता पाचवी वर्गातील वैष्णवी नामदेव केदारे हिचा पदवीपर्यंत शिक्षणाचे ‘शैक्षणिक पालकत्व’ स्वीकारणाऱ्या शहरातील उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष शंतनू भैया सगर यांनी जबाबदारी स्वीकारत युनिफॉर्म सह शालेय साहित्य दिले होते.त्यामुळे वैष्णवी च्या आईला आपल्या मुलीची शिक्षनाच्या खर्चाबाबत मोठा आधार लाभला.वैष्णवी ही अभ्यासात अत्यंत हुशार असल्याने तिला आयुष्यातील ध्येय गाठन्यास बळ लाभले.दीपावलीचा पर्व असल्याने आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना जसे नवे कपडे आणि मिठाई घेतो अगदी त्याप्रमाणे शंतनू सगर यांनी दत्तक घेतलेल्या वैष्णवी च्या घरी जाऊन सुखाची,जिव्हाळ्याची, आपुलकीची आणि माणुसकीची उधळण करीत नवे कपडे आणी फराळीचे पदार्थ देत वैष्णवीचे मनोबल वाढविले.यावेळी जि प शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे आणि वैष्णवीची आई होत्या.
शासनामार्फत 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण दिलं जातं. यामुळे इयत्ता आठवीपर्यंत 100 टक्के विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षण मोफत होत असल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात. मात्र त्यापुढील शिक्षणासाठी पालकांना स्वत: खर्च करावा लागतो.आर्थिक बिकट परिस्थितीतील गरीब कुटुंबातील सर्वच पालकांना हा खर्च परवडण्यासारखा नसतो. मुलांच्या पुढील शिक्षणाचा खर्च करण्यास असमर्थ ठरल्याने पालक मुलांना शाळेतून काढून घेतात.काही पालक आपल्या मुलांना इतरत्र रोजागारासाठी पाठवतात. हा आघात मुलांपेक्षा मुलींवर अधिक मोठ्या प्रमाणात होतो. शिक्षण सुरू असताना आठवीनंतर मुलींना शाळेतून काढून घेण्याचं प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे तर शालेय खर्चासाठी शिक्षण थांबलेल्या अशा मुलींना नंतर घरात ठेवण्यापेक्षा अल्पवयातच त्यांचं लग्न लावून देण्याचा पालकांचा प्रयत्न असतो.अलिकडच्या काळात बालविवाहाचं प्रमाण ग्रामीण आणि शहरी भागातही वाढलं आहे हे कटू सत्य आपल्यासमोर आहेच.तत्कालिक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद जिल्ह्यात बालविवाह सारख्या अनिष्ठ प्रथेविरोधात मोठी चळवळ सुरु करण्यात आली होती पण त्यांच्या एकाएकी झालेल्या बदली नंतर चळवळ ही थंडावली, आणि सर्रासपणे बालविवाह संपन्न होताना दिसून येतात पण यावर प्रशासन डोळेझाक करतानाचे चित्र स्पष्ट होत आहे.खऱ्या अर्थाने बालविवाह रोखून, मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे असेल, देशाच्या जि डी पी मध्ये भर घालायची असेल, उज्वल भविष्य घडवायचे असेल तर प्रत्येक नागरिकांने आपल्या परीने जबाबदारीने पुढाकार घेणे आवश्यक आहे हे ही तितकेच खरे..!

तेंव्हा शक्य असेल तर चांगली परिस्थितीत असलेल्यांनी निदान एखाद्या होतकरू गरजू आर्थिक बिकट परिस्थितीतील विद्यार्थ्याला अश्या रीतीने आधार दिल्यास त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नक्कीच शैक्षणिक व आर्थिक क्रांती घडू शकते.
“अभ्यासात हुशार असून काहीच उपयोग नसतो जेंव्हा घरात हालाखीच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते, विशेषतः एखाद्या मुलीला..!आजच्या काळात,शिक्षणाच्या बाजारीकरण व शैक्षणिक साहित्यांचे वाढते दर,त्यामुळे आर्थिक बिकट परिस्थितीत शिक्षणात खंड तथा ध्येय गाठन्यास बाधा ठरु शकते.याबाबत नेहमी मला भय वाटायचे पण शंतनू काकांमुळे मला आता काळजी वाटत नाही. माझ्या आईला मी आता काहीच मागत नाही. शंतनू काकाना दर्घायुष्य लाभो हिच इच्छा”.– कु.वैष्णवी केदारे,इयत्ता पाचवी,जि प उमरगा
सचिन बिद्री : उमरगा