सोलापूर : रोपळे क ता. माढा जि. सोलापूर येथे कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने रोपळे बस स्टॅन्ड ते पवार वस्ती कुर्डूवाडी रोड वरती सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अतिशय उत्साही वातावरणात सकाळी सात वाजता अनेक तरुणांनी सहभाग नोंदवला व रोपळे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये सहभाग घेऊन तरुण वर्गांचा उत्साह वाढवत त्यांना प्रोत्साहन दिली तसेच यावेळ कुर्डूवाडी पोलीस स्टेशनची सर्व पदाधिकारी तसेच व स्टाफ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. रोपळे गावचे ग्रामस्थ व तरुण वर्ग यांनी सहभाग घेऊन स्पर्धेची रंगत वाढवली. तसेच विजयी स्पर्धकांचा सत्कार ही करण्यात आला.
- संदीप भगत