सोलापूर : माढा तालुक्यतील प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने माठ्याचे पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
प्रहार शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सर्वसामान्य शेतकरी व गोरगरिबांचे कैवारी,अपंग आणि दिव्यांगाचे दैवत, महाराष्ट्राचा मानबिंदू आमचे लाडके नेते मा. राज्यमंत्री आ. ओमप्रकाश (बच्चु भाऊ कडू) यांच्या विषयी आमदार रवी राणा यांनी बेताल वक्तव्य करून बेकायदेशीर रक्कम घेतलेबाबत खोटे आणि मन घडत आरोप केले आहेत असे बेताल वक्तव्य करून बच्चु कडू यांची जन माणसातील प्रतिमा मलिन करण्याचे काम केले आहे. त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने आमदार रवी राणा यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उंदर गाव तालुका माढा येथे सकाळी 10 वाजता प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने रवी राणा यांच्या विचारांचा दशक्रिया विधी घालण्यात येणार आहे. हे. निवेदन देते प्रसंगी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल केसरे, दिनेश जगदाळे, उंदरगाव ग्रा. प. मा.उपसरपंच ऋषिकेश तांबीले, जमीर शेख, अमोल तांबिले, गणेश सुतार, विष्णु तांबीले, संतोष कोळी, विशाल कोतवाल यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
- संदीप भगत