नागपूर : खापरखेडा येथील महाराष्ट्र विद्यालयातील कुस्तीपटूंनी यांनी जवाहर विद्यालय, वाकोडी येथे संपन्न झालेल्या सावनेर तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करीत आपापल्या वयोगट व वजन गटात प्राविण्य प्राप्त केले व जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता आपली निवड निश्चित केलेली आहे. यामध्ये 14 वर्ष मुलींमध्ये 30 किलो वजन गटात कु.श्रध्दा गजभिये प्रथम, 32 किलो वजन गटात कु. वंशीका लांजेवार प्रथम, 39 किलो वजन गटात कु. रिया कडबे प्रथम तर 54 किलो वजन गटात कु. सुहानी घरडे हिनेही प्रथम प्राप्त केला. 14 वर्ष मुलांमध्ये 35 किलो वजन गटात आदित्य रेवतकर प्रथम, 48 किलो वजन गटात हर्ष सिंदुरकर प्रथम, 52 किलो वजन गटात सार्थीक उईके प्रथम, 17 वर्ष मुलींमध्ये 40 किलो वजन गटात कु. रिधीमा वासनिक प्रथम, 43 किलो वजन गटात कु. समीक्षा राजुरकर प्रथम, 53 किलो वजन गटात:- कु. खुशी शाहू प्रथम , 61 किलो वजन गटात कु. वैश्नवी वारकर प्रथम तर 69 किलो वजन गटात कु. ज्ञानेश्वरी घोरमोडे हिनेही प्रथम क्रमांक प्राप्त केला. 17 वर्ष मुलांमध्ये:- 68 किलो वजन गटात कुशल भीमराव आवळे याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. 19 वर्ष मुलांमध्ये 57 किलो वजन गटात:- दर्शन वाघधरे प्रथम , 65 किलो वजन गटात अनुपम यादव प्रथम व 125 किलो वजन गटात पार्थ शेलारे याने प्रथम प्राप्त केला. कु. जयश्री सपाटे, कु. स्मिता रंगारी, धनंजय गायकवाड, अभय बंदेवार, सम्यक चव्हाण, नयन पाटील यांना मात्र दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. सर्व प्राविण्य प्राप्त कुस्तीगीर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत सावनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार असून कुस्तीपटूंना क्रीडाशिक्षक धैर्यशील सुटे व धर्मेंद्र सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

संस्थेचे अध्यक्ष सुनील केदार, सचिव सुहासताई केदार, पंचायत समिती सावनेर च्या सभापती अरुणाताई शिंदे, उपसभापती राहूलभाऊ तिवारी, मुख्याध्यापक लक्ष्मण राठोड, उपमुख्याध्यापक चंद्रशेखर लिखार, पर्यवेक्षक प्रमोद इखे, संजय देवतळे, क्रीडाशिक्षक धैर्यशील सुटे, धर्मेंद्र सुर्यवंशी, किशोर पाटील, कर्मचारीवृंद व गावकऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *