हजारोच्या संख्येने विद्यार्थी उपस्थित
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी येथे संविधान फाऊंडेशन नागपूर, शाखा-अहेरी, तालुका अधिवक्ता/वकील संघ अहेरी, तालुका विधी सेवा समिती अहेरी च्या संविधान दिनाच्या औचित्य साधून वॉक फोर संविधान रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. आयोजीत रॅलीत शालेय विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मुल्ये रुजविणे, संविधानाबाबत जाणीव जागृती निर्माण करणे, समाजात संविधान संस्कृती निर्माण करणे. या उद्देशाने संविधान फाऊंडेशन नागपूर, शाखा-अहेरी, तालुका अधिवक्ता/वकील संघ अहेरी, तालुका विधी सेवा समिती अहेरी, भगतसिंग फॅन्स क्लब अहेरी यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथे वॉक फाॅर संविधानाचे आयोजन करण्यात आले. रॅलीला नगरपंचायतच्या अध्यक्षा रोजा करपेत व मुख्याधिकारी अजय सालवे यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केले. या रॅलीत गृह रक्षक दल, लक्ष्य स्पर्धा परिक्षा केंद्र अहेरी, एस.बी. महाविद्यालय अहेरी, राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय अहेरी, भगवंतराव महाविद्यालयअहेरी, मॉडेल स्कूल अहेरी, धर्मराव कृषी विद्यालय अहेरी, एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूल अहेरी, रिपब्लीक स्कूल अहेरी, संत मानवदयाल विद्यालय अहेरीच्या दोन हजाराच्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हॉकी ग्राऊंड येथून जयघोष व संविधान गीतांसह निघालेल्या रॅलीचे समारोप गांधी चौक अहेरी येथे करण्यात आले. ऍड. उदयप्रकाश गलबले व मुख्याधिकारी अजय सालवे यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य नागसेन मेश्राम, ऍड. सतीश जैनवार, ऍड पंकज दहागांवकर, होमगार्डचे प्रमुख काझी हे उपस्थित होते.