माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली झंझावाती प्रचार सभा होणार
गडचिरोली:- एटापल्ली तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली तसेच विद्यमान सरपंच प्रशांत आत्राम यांच्या देखरेखित भाजपा तर्फे सरपंच पदासाठी कु. वनिता महारू कोरामी यांनी तर सदस्य पदासाठी बासु गावडे, राधिका कोरामी, ललिता तांडो, प्रकाश मठ्ठामी, यांचा उमेदवारी अर्ज काल तहसील कार्यालय एटापल्ली येते दाखल करण्यात आले, ह्यावेळी बाबुरावजी गंपावार जिल्हा उपाध्यक्ष भाजपा गडचिरोली, अशोकजी पुल्लुरवार तालुका उपाध्यक्ष, रैनेद्रजी येमला, अशोक चकिनारपवार, गणेश खेडेकर, उशण्णा मेडीवार, प्रशांत आत्राम विद्यमान सरपंच तथा जिल्हा महामंत्री अनु जमाती मोर्चा भाजपा, खेळचंद वैरागडे महामंत्री ओबीसी आघाडी भाजपा एटापल्ली, साईनाथ वेलादी तालुका महामंत्री अनु जमाती भाजपा एटापल्ली, सागर मंडल भाजपा कार्यकर्ता एटापल्ली, मनिष ढाली, सुधिर तलांडे,बालाजी वेळदा, चेतन चुनारकर, राजु गावतुरे, राज मंडल, त्रिशुल कावळे,दिशांत वाघाडे,सूजल कथले, अमित सोनी, भाऊजी भोगामी, राहुल पांडे, संघपाल बोरकर सह एटापल्ली आणि तोडसा येतील भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.