गडचिरोली : मार्कडादेव (सतीश आकुलवार)
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्हयातील चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी श्रीक्षेत्र मार्कडादेव येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्ताने फार मोठ्या यात्रे चे आयोजन असते.यात्रा काळात संपुर्ण मार्कडादेव नगरी ही यात्रेकरुनी भरुन असते.याकाळाता स्थानिक नागरिक,शेतकरी शालेय विद्यार्थी यांच्या चारचाकी वाहन ,दुचाकी वाहन बैलबंडी, सालकल ने ये-जा करण्यासाठी मार्गच ऊपलब्ध नसतो त्याअनुषंगाने आपल्या स्तरावरुन या सर्व बाबीचा विचार करुन मार्कडादेव येथील नागरीकाकरीता विशेष व्यवस्था किवा पर्यायी मार्गाची व्यवस्था ऊपलब्ध करुन द्या.अशी मागणी मार्कडेश्वर बहुऊद्देशीय सुशीक्षीत बेरोजगार विकास संस्थाचे अध्यक्ष प्रा.संतोष सुरपाम यांनी गडचिरोली चे जिलाधिकारी संजय मीणा यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
