स्वर्गीय शिक्षण महर्षी राजे विश्वेशवरराव महाराज यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष झाले -अम्ब्रीशराव आत्राम
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या सीमेवर असलेल्या सिरोचा येथील धर्मराव विघालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सोहळा राजे अम्ब्रीशराव अात्राम व अवधेशराव बाबा आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला
यावेळी धर्मराव विद्यालयाचे विद्यार्थीनी लेझीम नृत्याने जंगी स्वागत करण्यात आले
स्नेहसंमेलनाच्या प्रास्ताविक भाषणात शाळेचे प्राचार्य जी जे तगरे यांनी धर्मराव शिक्षण मंडळाची स्थापना पासून आतापर्यंतचे राज कुटुंबातील स्वर्गीय धर्मराव महाराज व स्वर्गीय विशेशवरराव महाराज व स्वर्गीय सत्यवान महाराज यांच्या जीवनशैलीवर एक लक्ष दिला गडचिरोली जिल्ह्यातील कानकोपऱ्यात आदिवासी दुर्गम भागातही धर्मराव शिक्षण संस्थेने शिक्षण पोहोचविला अनेक दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमाने घडवून आणल्याची संगितले.
सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत चे उपाध्यक्ष बबलू भाई पाशा आविसचे नेते बाबर भाई व सेवानिवृत्त प्राचार्य पापया नरेडला, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर नरहरी व अहेरी तालुका अध्यक्ष रवी नेलकुंदरी, भाजपचे सहसचिव संदीप राचार्लावार पोलीस निरीक्षक विश्वास जाधव ,पोलीस उपनिरीक्षक कांदे, पोलीस उपनिरीक्षक धविले, धर्मराव विद्यालयाचे प्राचार्य जी.जे तगरे सदर कार्यक्रमास मंचावर उपस्थित होते.
एन टिव्ही न्युज मराठी
गडचिरोली