बुलढाणा : मलकापूर येथील ऐतिहासिक लायब्ररी पटांगणात ४५ वर्षीय इसमाचा संशयास्पद अवस्थेत म्रुतदेह आज सोमवारी सायंकाळी आढळून आला. ओळख पटलेली नाही मात्र तोंडावर ठेचल्याचे व आजूबाजूला मोठे दगड असल्याने त्याचा खून झाल्याचा कयास आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,येथील ऐतिहासिक लायब्ररी पटांगणात हिराबाई संचेती कन्या शाळेनजीक अज्ञात ४५ वर्षीय इसम मरुन पडल्याचे आज सोमवारी सायंकाळी उघडकीस आले. काही नागरिकांनी त्या बाबतची माहिती पोलिसांना दिली.
त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर,ऐ.पी.आय सुखदेव भोरकडे,पो.उप.नि रतनसिंग बोराडे,पो. काॅ ईश्वर वाघ, सलीम बरडे अनिल डागोर, इम्रान पठाण, गजानन मुंढे, आसिफ शेख आदी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी पंचनामा करुन म्रुतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे. प्रभारी पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल कोळी यांनी देखील भेट दिली आहे.
प्राप्त माहीतीनुसार म्रुतक इसमाचा अंदाजे दोन तीन दिवसापूर्वी म्रुत्यु झाल्याच दिसून येते. त्याचे तोंडाभोवती मोठे दगड असून रक्त दिसून येते. तोंड ठेचल्याचे दिसत असल्याने त्या इसमाचा खून झाल्याचा कयास आहे.
यासंदर्भात पोलिसांशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की,म्रुतकाजवळ चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात गोपाल असे लिहिले असून मोबाईल नंबर देखील आहे.तो नंबर बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *