उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये ग्राहकांचे हक्क व अधिकार यावरती मार्गदर्शन करण्यात आले याच कार्यक्रमांमध्ये मराठवाडा विभागाच्या काही निवडी करण्यात आल्या. त्यामध्ये मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी येडशी येथील सामाजिक कार्यकर्ते मा. अशोकराव अरुण देशमुख यांची निवड करण्यात आली त्यांना निवडीचे पत्र ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तानाजीराव गुंड ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष माननीय सतीश कुमार बुरगुटे, माननीय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दशरथ उकिरडे, यांच्या हस्ते व येडशी गावचे प्रथम नागरिक नूतन सरपंच माननीय डॉक्टर प्रशांत पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून येडशी चे प्रथम नागरिक सरपंच माननीय डॉक्टर प्रशांत पवार प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय तानाजीराव गुंड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दशरथ उकिरडे बार्शी तालुका ग्राहक समिती अध्यक्ष मा. विष्णू पवार महिला संघटक अनिता गवळी महिला तालुकाध्यक्ष रेखा कसबे बार्शी तालुका ग्राहक समिती मार्गदर्शक सारंगधर पप्पा जगदाळे डीडी देशमुख येडशी, येडशी विकास सोसायटी क्रमांक 1 चेअरमन बाजीराव देशमुख भाजपा अध्यक्ष गजानन नलावडे, बाळासाहेब तोडकरी, बाजीराव देशमुख, अमोल ठाकर, उस्मानाबाद अर्बन बँकचे चेअरमन निलेश देशमुख, बाळासाहेब जगदाळे, बाळासाहेब तोडकरी, अजित नलावडे, बालाजी नागटिळक, प्रभाकर सस्ते, बाबा शेख, पोपट पवार, प्रभाकर सस्ते, कल्याण पाटील, रमेश पाटील, मोहन थोरात यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते . अध्यक्ष पदावरून बोलताना मा.डॉ.प्रशांत पवार यांनी राजकारणात जनता ‘राजा’ असते, तशी ग्राहकांमध्ये ग्राहकांचा राजा ग्राहक असतो. सर्व नूतन पदाधिकारी ग्राहक समिती सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

तसेच नुकत्याच येडशी ग्रामपंचायत सरपंच पदी नियुक्ती झालेले मा डॉ. प्रशांत पवार यांचा सत्कार ग्राहक समितीच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक धर्मराज देशमुख यांनी केले व आभार प्रदर्शन बाजीराव देशमुख यांनी केले या कार्यक्रमाला येडशी येथील ग्राहक परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी उस्मानाबाद
मो.नं9922764189