वाशिम:- सोनाराच्या दुकानावर कारागीर म्हणून काम करणाऱ्या कारागिरांनी सोने चोरत मालकालाच चुना लावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशिम येथील सोनार आशिष चौधरी यांच्या सुभाष चौक येथील सोन्याच्या दुकानात कारागीर म्हणून काम करणाऱ्या मजुरांनी दुकानातील सोने चोरून नेले या आशयाच्या फिर्यादीवरून पो.स्टे.वाशिम शहर येथे अप.क्र.७८३/२०२२ कलम ३८१, ३४ नुसार गुन्हा दाखल झाला होता.
सदर प्रकरणाचा तपास करत असतांना आरोपी नामे मोहन दोलाई याचे मोबाईल लोकेशन हे कोल्हापूर येथे येत असल्याने सदर ठिकाणी जाऊन त्याचा शोध घेत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून त्याचा गुन्ह्यातील साथीदार शेख नूर आलम हा परळी येथून अकोला मार्गे बंगाल येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास रेल्वे स्थानक, वाशिम येथून ताब्यात घेण्यात तपास पथकास यश आले. चौकशीमध्ये त्यांनी सोने चोरीची कबुली दिली व ते सोने मुंबईतील मस्जिद बंदर येथील सोनाराला विकले असल्याचे सांगितले. त्यावरून मुंबईतील मस्जिद बंदर येथील सोनाराकडून सदर गुन्ह्यातील मालमत्ता अंदाजे किंमत २.५ लाख रुपयांचे ५० ग्रॅम सोने रिकव्हर करण्यात आले असून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनीलकुमार पुजारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार रफिक शेख, सपोनि.रमाकांत खंदारे, पोहवा.लालमनी श्रीवास्तव, नापोकॉ.ज्ञानदेव म्हात्रे, रामकृष्ण नागरे, पोकॉ.अनिल बोरकर, विठ्ठल महाले, संदीप वाकुडकर यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *