वाशिम:- दिनांक २८/०१/२०२३ रोजी रथसप्तमी जयंती निमीत्त होवु घातलेल्या नाथनंगे महाराज
यात्रा ग्राम डव्हा येथे दिनांक १९/०१/२०२३ रोजी मा.पोलीस अधिक्षक साहेब, वाशिम श्री
बच्चनसिंह यांनी भेट देवुन यात्रेच्या परीसराची पाहणी तसेच नाथनंगे महाराज मंदीराचे परीसराची
पाहणी करून नाथनंगे महाराज मंदीराचे विश्वस्त व जउळका ठाणेदार प्रदीपकुमार राठोड यांना यात्रे
निमीत्त सिसिटीव्ही कॅमेरे लावण्या बाबत सतेच गर्दीवर नियत्रंण ठेवण्या करीता पार्कींग व्यवस्था व
बॅरीकेटींग करणे बाबत सुचना दिल्या.

तसेच मंदीरामध्ये दर्शना करीता स्त्रि व पुरुषाच्या वेगवेगळया
लाईन लावण्या बाबत सुचना दिल्या सदर बैठकी करीता नाथनंगे संस्थानचे विश्वस्त श्री सुरेशराव
घुगे, उपाध्यक्ष डॉ निवासराव मुंढे (पोलीस पाटील), सदस्य गोवर्धन महाराज राउत, डॉ जगदीशराव
घुगे, कैलासराव देशमुख, नारायणराव घुगे, घनशाम सांगळे, रजिंतराव घुगे तसेच स्थानिक गुन्हे
शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ जाधव साहेब, जिल्हा विशेष शाखा वाशिम सपोनी विनोद
झळके साहेब, ए.टी.बीचे प्रमुख पोउपनि अनिल पाटील व पोलीस स्टेशन जऊळका येथील ठाणेदार
प्रदीपकुमार राठोड, पोउपनि अमोल गोरे व पोलीस स्टॉफ हजर होते.

नाथनंगे महाराज यात्रेच्या
नियोजना बाबत विश्वस्ताना विचारपुस करून यात्रा सुरळीत पडण्याचे दृष्टीने योग्य ते मार्गदर्शन केले.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206