वाशिम:- मालेगाव तालुक्यातील किन्हिराजा येथील वरली मटक्यावर मंगरुळपीर येथिल एसडीपीओसह त्यांच्या पथकाने पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर चालू असलेल्या आठवडी बाजारातील वरली मटक्याच्या अवैध धंद्यावर २० जानेवारी रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास टाकलेल्या धाडीत रोकरखमेसह लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असुन यामध्ये २० जणांना येथे जुगारातून ताब्यात घेतल्याची घटना किन्हीराजा येथिल आठवडी बाजारात घडली.
वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याना उत आला असुन याकडे पोलीसांचे अर्थपूर्ण दूर्लक्ष असल्याची ओरड सामान्य जनतेमधुन रोजच होत आहे.गांव तेथे अवैध व्यवसाय जणू हे समिकरणच बनल्याचे प्रत्येक गांवात दिसुन येते.माञ कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिकारी श्री बच्चनसिंग यांनी अवैध धंद्याना लगाम घालण्यासाठी जिल्हात धाडसञ सुरू केल्याने श्री बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनात मंगरुळपीर येथिल प्रभारी एसडीपीओ जगदीश पांडे यांनी 20 जानेवारी रोजी आपल्या मंगरुळपीर येथील एसडीपिओ कार्यालयातील पथकासह किन्हीराजा येथिल वरलीमटक्याच्या अड्ड्यावर दुपारी चार वाजेदरम्यान धाड टाकुन वरली मटका चालक गोंडाळ यांच्यासह विस जणांना वरली जुगार खेळतांना रंगेहात पकडून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून नगदी ४७४३० रोख रक्कमेसह २० मोबाईल अंदाजे किंमत ६१ हजार रुपये,४ मोटारसायकल अंदाजे किंमत २ लाख रुपये असा लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर कारवाई वाशिमचे पोलिस अधिक्षक श्री.बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनात मंगरुळपीर ऊपविभागाचे प्रभारी एसडिपिओ श्री.जगदिश पांडे यांच्या नेतृत्वात सपोनी मंजुषा मोरे,एएसआय मानिक चव्हाण,पो.काॅ.इस्माईल कालिवाले,पो.काॅ.रामेश्वर राऊत,पो.काॅ.मंगेश गादेकर,म.पो.काॅ.रुपाली वाकोडे आदींच्या सहभागात सदर कारवाई करण्यात आली.याप्रकरणी आरोपिवर गुन्हे नोंदविन्यात आल्याची माहीती पोलीस सुञाकडुन मिळाली.

प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *