उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले होते. चंद्रपूर येथे अपर पोलिस अधीक्षक असताना कुलकर्णी यांनी केलेल्या कार्य व सेवेबद्दल हे पदक देण्यात आले आहे.
गडचिरोली व चंद्रपूर या नक्षलग्रस्त भागात विशेष सेवा देत चांगली कामगिरी केल्या बद्दल हे पदक जाहीर करण्यात आले आहे.
