औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामधे सध्या नेते पुढारी यांची हुकुमशाही सुरु असुन घरकुलांचा लाभ हा धनदांडग्यांना आणि पक्षाचे कार्यकर्ते यांनाच व त्यांच्या नातेवाईकांना दिला जात आहे रमाई आवास योजनेचे जे घरकुल आहे त्यामधे पुढा-यांच्या दबावाखाली एका एका कुटुंबामधे दोन दोन, डबल पुन्हा त्याच लाभधारकाला आणि नातेवाईकांना घरकुल दिले जात आहे त्यामुळे अनेक गोरगरीब गरजु लाभार्थ्यांवर मोठा अन्न्याय होत आहे या अन्न्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्टीय काँग्रेस अनुसूचीत जाती विभाग सोयगाव तालुका अध्यक्ष सुनिल नारायण माकोडे यांनी चौकशी करण्यासाठी गटविकास अधीकारी पंचायत समिती सोयगाव यांच्याकडे तक्रार दिलेली आहे आणि २००० ते २०२२ पर्यंत ज्या ज्या लाभधारकांना घरकुल दिलेले आहे त्यांची यादी मागीतलेली आहे परंतु या साठी अर्ज करुन ही माहिती दिली जात नाही नंतर केंद्राचा २००५ कायद्याअंतर्गत माहितीचा अधीकार कायद्यामधे माहिती मागीतलेली असताना सुद्धा माहिती दिली जात नाही हुकुमशाही पद्धतीने काही नेते पुढारी या प्रकरनाला दबाव तंत्र निर्माण करुन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करित आहे काही पक्षाचे कार्यकर्ते स्वता घारकुलाचा लाभ घेऊन स्वाताच्या नातेवाईकांना लाभ देत आहे ही मनमाणी हुकुमशाही तांडव कधी थांबनार हा गोरगरीबांवरती अन्न्याय झाल्याचे तक्रारदार सुनिल माकोडे यांनी सांगितले
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद