section and everything up until
* * @package Newsup */?> वैजापूर पोलीस ठाणे हद्दीमधे शस्त्राने मारहान करुन रोड रॉबरी करणाऱ्या चोरट्यांना वैजापुर पोलीसांनी पाठलाग करुन काही तासातच केले जेरबंद. | Ntv News Marathi

औरंगाबाद

दिनांक- २४/0२/२०२३ रोजी २३.३० वाजताच्या सुमारास डायल ११२ वर माहिती मिळाली की, शिवराई. ता. वैजापूर शिवारात रोडने जाणाऱ्या दोन मोटार सायकल स्वारांना पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी क्रमांक- MH-२३-AD-१२१६ ज्यामध्ये चार ईसम असुन त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू असे घातक शस्त्र असुन त्यांनी त्या मोटार सायकल स्वारांना व त्यांच्या सोबतच्या महिलांना मारहान करुन त्यांच्या अंगावरील सोने व पैसे लुटुन नेले आहेत व ती गाडी लासुर स्टेशनच्या दिशेने गेली आहे.
जबरी चोरीचे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने मनीष कलवनिया पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण त्यांनी तात्काळ स्वतः वायरलेस द्वारे सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. याचप्रमाणे वैजापूर उपविभागातील सर्व पोलीस ठाणे अंतर्गत पोलिसांची पथके तयार करून त्यांना संशयित वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या.
याचप्रमाणे वैजापूर पोलिसांची तीन पथक तयार करून एक पथक शिवराई, करंजगांव भागाकडे रवाना केले. तर दुसरे पथक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा वैजापुर येथे व तीसरे पथक गंगापूर चौफूली नाकाबंदीसाठी लावले.
यावेळी संशयित वाहनाने आंबेडकर चौकातील नाका बंदी ही भरधाव वेगाने तोडून पुढे येवला रोड रोडच्या दिशेने सुसाट वेगाने निघाले. वैजापूर पोलिसाच्या सर्व पथकांनी वाहनाचा मागे पाठलाग सुरू केला हा थरार रात्रीच्या दोन वाजेपर्यंत सुरू होता. पोलीस मागावर असल्याचे बघून आरोपीनी त्यांचे वाहन पुरणगाव रोड नेऊन शेतीच्या कडेला लावून वाहन लॉक करून अंधारात शेताच्या दिशेने पळत सुटले यावेळी मागावर असलेल्या पोलिसांनी सुद्धा त्यांचा शेवटपर्यंत पाठलाग सुरू ठेवून अंधाऱ्या शेतामध्ये दोन किलोमीटर पर्यंत पळत जाऊन दोन चोरट्यांच्या मुस्क्या आवळून त्यांना जेरबंद केले. दोन आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
यावेळी १) सौरभ उर्फ बाबू विकी रुझासिओ वय 19 वर्ष रा. ईनामवाडी, शिर्डी ता. जि. अहमदनगर, २) कृष्णा प्रकाश भोळे वय 24 वर्ष रा. आंबेडकर नगर सिन्नर जि.नाशिक यांना पकडले.
पकडलेल्या दोन आरोपीतांकडून दोन लोखंडी रॉड, एक बोलेरो गाडी क्रमांक- MH-२३-AD- १२१६ हे जप्त करण्यात आले आहे..
यातील जखमी नामे- ज्ञानेश्वर सुभाष डुकरे वय 26 वर्ष व्यवसाय शेती व होमगार्ड रा. तिडी, ता. वैजापुर जि. औरंगाबाद यांचे जबाब नोंदवून कलम ३९४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे .पूढील तपास वैजापूर पोलीस करीत आहे.
रोड रॉबरी करणाऱ्या या चोरट्यांची २३.३० वाजेला माहिती मिळतात अत्यंत सतर्कपणे त्यांना दोन ते अडीच तासात जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी पकडे पर्यंत मा. पोलीस अधीक्षक त्यांनी स्वतः रात्रभर सर्व परिस्थिती हाताळण्याबाबत मार्गदर्शन व सूचना देऊन सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवले होते.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय लोहकरे,पो.उप नि मनोज पाटील, पो.उप.नि रज्जाक शेख, सफौ / महादेव निकाळजे, सफी/विठ्ठल जाधव, पोलीस अंमलदार योगेश झाल्टे, भगवान सिंघल, प्रशांत गिते, विजय भोटकर, वाल्मीक बनगे, गोरक्ष सदगीर, नवनाथ केरे, नवनाथ निकम, ज्ञानेश्वर पाडळे, गणेश पैठणकर, मपोना/सिमा जाधव, तीन होमगार्ड यांच्या पथकाने केली आहे.

प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *