section and everything up until
* * @package Newsup */?> सायबर भामट्याने लाईट बंद होणार आहे असा मेसेज पाठवून ज्येष्ठ नागरिकाचे पळविलेले एक लाख ३२ हजार रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले | Ntv News Marathi

औरंगाबाद

आपण आधुनिक डिजीटल युगात वावरतांना किंवा मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार, किंवा समाजमाध्यमांचा वापर करतांना सतर्क राहणे गरजेचे आहे. आपण योग्य ती सर्तकता न बाळगल्यास अज्ञात भामटे आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून आपले आर्थिक, वैयक्तिक नुकसान करु शकतात.
जेष्ठ नागरिक तक्रारदार नामे भास्कर सोपान चौधरी एका खाजगी फर्ममधून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालेले असून त्यांना दिनांक ०७/०२/२०२३ रोजी त्यांना त्यांचे व्हाट्सअप क्रमांकावर तुमचे वीज बिल प्रलंबित असून त्यांचा तात्काळ भरणा करा नसता तुमचे कनेक्शन बंद करण्यात येईल असा मेसेज आला होता तसेच कनेक्शन बंद करायचे नसेल तर मेसेज मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करण्याबाबत लिहीले होते.यावरून तक्रारदार यांनी मेसेज मधील मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता समोरील सायबर भामटयाने त्यांना एका लिंकवर क्लिक करण्यास सांगून एक क्विक सपोर्ट नावाचे रिमोर्ट एक्सेसचे अॅप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या परस्पर इंटरनेट बँकींचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातील १,३२,०००/- रूपयांचे ५०,०००/- रूपयांचे दोन व ३२,०००/- रूपयांचे एक असे ऑनलाईन व्यवहार करून त्यांची फसवणूक केली होती.
त्यांना पैसे कट झाल्याचे मेसेज आले असता त्यांनी तात्काळ पो.स्टे. सायबर औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क करून माहिती दिली पो.स्टे. सायबर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नमूद प्रकाराची माहिती घेवून तात्काळ तक्रारदार यांचे पैसे ज्याठिकाणी वापरण्यात आले होते. त्यासंबंधीत यंत्रणेस संपर्क साधला व तक्रारदार यांचे बँक खात्यातून झालेले व्यवहार तात्काळ थांबवून गेलेली रक्कम जागीच ब्लॉक करण्यास सांगितले.
यावरून संबंधीत नोडल अधिकारी व यंत्रणनेने तात्काळ प्रतिसाद दिला व तक्रारदार यांचे खात्यातून गेलेली एकूण १,३२,०००/- रूपये रक्कमेचे व्यवहार थांबवले तसेच नमूद संपूर्ण रक्कम दिनांक २३/०२/२०२३ रोजी तक्रारदार यांचे बँक खात्यात त्यांना परत मिळवून दिले.
तक्रारदार जेष्ठ नागरिक यांनी मनीष कलवानिया,पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण यांना प्रत्यक्ष भेटून सायबर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या जलद कारवाईबद्दल कामाचे कौतुक करून आभार व्यक्त केले.कोणाच्याही सांगण्यावरून Quick Suppport, Any Desk, ammyyadmin सारख्या रिमोट अॅक्सेस करणा-या अॅप अज्ञाताचे सांगण्यावरून इन्स्टॉल करु नका त्यांना अॅक्सेस देवू नका. कुठल्याही संदेशाबाबत अगोदर खात्री करा.असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण येथे संपर्क साधावा असे आवाहन मनिष कलवानिया, पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांनी केले आहे.
नमूद कारवाई मा.मनिष कलवानिया,पोलीस अधिक्षक औरंगाबाद ग्रामीण, सुनिल लांजेवार,अपर पोलीस अधिक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांचे मार्गदर्शनानुसार देविदास गात, पो.नि, सायबर, प्रविण पाटील, भारत माने पो.उप.नि, पो.ह/कैलास कामठे, संदिप वरपे, नितिन जाधव, रविंद्र लोखंडे, सविता जायभाये, लखन पचोळे, योगेश दारवंटे, मुकेश वाघ, रूपाली ढोले, शितल खंडागळे सायबर पोलीस ठाणे औरंगाबाद ग्रामीण यांनी केले.

प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *