हिंगोली : जिल्ह्याभरात यावर्षी खरीप हंगामात पाऊसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद, मुग, हळद या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शासनाकडुन नुकसान भरपाई मिळाली तर दुसरीकडे मात्र येथील शेतकऱ्यांना पिकवीमा भरुनही पिकवीमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही,तर शासन ही शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देत नाही यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सेनगाव तहसीलदार जिवन कुमार कांबळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवून सेनगाव तालुका तेलंगणा राज्यात समाविष्ट करावा अशी अफलातून मागणी केली आहे निवेदनात म्हटले आहे की शेतकऱ्यांना पेंशन द्या, सोयाबीन, कापुन शेतीमालाला भाव द्या, सर्व शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्ज माफ करा, अन्यथा सेनगाव तालुका तेलंगणा राज्यात समाविष्ट करावा अशी एक अनोखी मागणी सेनगाव तहसीलदारमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन कावरखे, नामदेव पंतगे, यांनी केली आहे.
हिंगोली प्रतिनिधी फारुख शेख