पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली १८ जणांवर कारवाई
नगर प्रतिनिधी(दि.२४ मार्च) :- कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तसेच शहर परिसरातील नागरिकांना व महिला मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंना कोतवाली पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.येथील वाडीयापार्क व परिसरात राहणाऱ्या महिला,फिरायला येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, व्यायामासाठी,फिटनेससाठी येणाऱ्या महिला,कोचिंग क्लासेससाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंकडून त्रास दिला जात होता.
काही रोडरोमिओ हे जोरात मोटारसायकल चालविणे, मोठमोठ्याने हॉर्न वाजविणे, रस्त्यावर वाहने लावून वाढदिवसाचे केक कापणे, मुलींच्या अंगावर पाण्याच्या बाटल्या तसेच पाणी फेकणे तसेच वाडीयापार्क परिसरात दारु पिवून तेथेच बाटल्या फेकणे तसेच मुलींचे पालक त्यांना घेण्यासाठी आल्यानंतर त्यांचे अंगावर पाणी फेकने असे प्रकार करून त्यांना त्रास देत होते.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात प्राप्त तक्रारींचा आढावा घेऊन त्या अनुषंगाने कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मागदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस अंमलदारांनी वाडीयापार्क येथील संपुर्ण परिसर, टिळकरोड,वाडीयापार्क मैदानाच्या बाहेरील दुकानाच्या रांगेसमोर गस्त घालत वेगात गाडी चालवणारी व गोंधळ घालत असणारी मुले ताब्यात घेतली