उमरगा:प्रतिनिधी
शहरातील वाढती सिमेंटचे जंगली आणि ग्रामीण भागात होणारी अवैध वृक्षतोड यामुळे चिऊताईचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एरवी अंगणात, घरात आणि जेवणाच्या तटाजवळ येऊन बसणाऱ्या चिऊताई चे आता दर्शन होणेही मुश्किल बनले आहे . दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या घटक चालली असल्याचे दिसत आहेत. म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक चिमणी दिवस साजरा करण्यात आला. पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकावयाचा असेल तर सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन डॉ. मनोरंजना निर्मळे यांनी या प्रसंगी केले.
डॉ. निर्मळे पुढे म्हणाल्या की, जगभरात २० मार्च २०१० पासून जागतिक चिमणी दिवस (वर्ल्ड स्पॅरो डे) म्हणून साजरा केला जातो. अलीकडचे वाढते शहरीकरण, प्रदूषण, रासायनिक खते व कीटकनाशकाचा बेसुमार वापर, मोबाईल टॉवर्स आणि घरट्यांसाठी वृक्षांची अनुपलब्धता चिमण्यांची संख्या कमी करत आहे. एका सर्वेक्षणानुसार पूर्वीपेक्षा चिमण्यांची संख्या ६० ते ८०% ने कमी झाली आहे. यामुळे अन्नसाखळी धोक्यात येण्याचे चिन्हे निर्माण झाली आहेत. याच कारणामुळे चिमण्यांचे संरक्षण व्हावे व त्यांच्या संख्येमध्ये व त्यांच्या संख्येबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून या चिमण्यांचे जतन व संवर्धन गरजेचे आहे. त्यांना वाचवण्यासाठी घराजवळील गच्चीवर धान्य, पाणी ठेवणे, अडगळीची जागा निर्माण करणे, खोपे तयार करून ठेवणे , कीटकनाशकाचा वापर कमी करणे, शिकार न करणे यामुळे चिमण्यांची संख्या वाढू शकते पुन्हा त्यांचा चिवचिवाट ऐकू येईल. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य डॉ. धनाजी थोरे, उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, उपप्राचार्य जी. एस. मोरे, डॉ. पी. एल. सावंत, डॉ. ए. एस. शिंदे , डॉ. आर. आर. नितनवरे, प्रा. ज्योती जोडदापके, प्रा. वसुंधरा निचत, प्रा. बकुळ कांबळे, प्रा. बिना लोकरे, प्रा. विद्या पाटील, आदी उपस्थित होते.