सचिन बिद्री:धाराशिव
उमरगा तालुक्यातील गुगळगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना ग्रामपंचायत उत्पनातील 5% निधी दि 1एप्रिल रोजी सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले.यावेळी सर्व दिव्यांग बांधव,प्रतिष्टीत नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तब्बल 36 दिव्यांग लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्थे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषिसहायक ढोकळे, अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा ताई, ग्रामसेवक आदी मान्यवर होते.
जिल्हा परिषद, महानगरपालिका पंचायत समिती,नगरपालिका,ग्रामपंचायत यांनी स्वउत्पन्नातील 5% निधि हा विविध अपंग / दिव्यांग कल्याणकारी योजना यांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य असून तो वेळेत लाभार्थाना वितरित करणे अपेक्षित असताना बऱ्याच वेळा हा निधी वाटप करण्यास टाळाटाल किंवा दिरंगाई केली जाते.
यामुळे आपलं हक्क मागण्यासाठी दिव्यांग बांधव आंदोलनाची भूमिका बजावत रस्त्यावर उतरताना दिसून येतात.ज्यांना हात नाही, पाय नाही, काहींना दृष्टी नाही तर काहींना बोलताही येत नाही अश्या दिव्यांग बांधवानाही आपलं हक्क मागण्यासाठी आंदोलन करावे लागते ही खूप खेदजनक बाब आहे.उमरगा तालुक्यातील गुगळगाव ग्रामपंचायतिच्या या उपक्रमाचा इतर ग्रामपंचायतिनी आदर्श नक्कीच घ्यावा.