नाशिक : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखमापुर फाटा परिसरात पोलीसांनी सापळा लावून कत्तली साठी घेऊन जाणा-या दोन पिकअप गाड्या काही वेळाच्या फरकाने पोलिसांनी पकडल्या. यात गायी, वासरे, बैल असे एकुण १२ गोवंशच सह ९ लाख ८४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीने त्यांनी त्यांचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व पोलिस कर्मचारी कुणाल मराठे, अण्णा जाधव, कमलेश देशमुख,भगवान उदार, सुनिल ठाकरे, किरण धुळे यांनी आज ता. १८ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास लखामपूर फाटा सापळा लावण्यात आला होता. कोशिंबे मार्गे नाशिक कडे जाणारे दोन पिक अप एमएच ४३ बीबी ०७५६ व एमएच ०४एचडी
५५५७ या दोन पिकअप गाडी पकडल्या पंधरा ते वीस मिनिटाच्या फरकाने गाड्या पकडल्या आहे. यामध्ये जनावराचे पाय तोंड बांधुन निर्दयीपणे कत्तली साठी नेत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी पिकअप चालक कादिर अकिल नाईकवडे ,रा. जामुनमाथा, ता. सुरगाणा, जुबेर हुसेन शेख, रा. उंबरठाण, ता. सुरगाणा याना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दोन पिक अप गाडी व १२ गोवंश जातीचे जनावरे हस्तगत केले. एकुन ९,८४००० रूपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला. यातील जनावरांची सुटका करून वणी येथील गोशाळेत सोडण्यात आले. सुरगाण्याच्या परिसरातुन अनेकदा कत्तली साठी नेण्यात येणारी जनावर पकडली जातात. पुर्वी वणी मार्गे ही अनेक कारवाया झाल्या आहे. आता एवढ्यात करंजखेड कोशींबे या मार्गावरुन जात असल्याचे कारवाईत दिसुन येत आहे.
दिगंबर पाटोळे – वणी नाशिक