बलसुर येथे एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रमांतर्गत बैठक
(सचिन बिद्री उमरगा)
उस्मानाबाद : तालुक्यातील बलसुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना .जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार एक तास राष्ट्रवादीसाठी आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमा अंतर्गत महिन्याच्या प्रत्येक शनिवारी लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात ग्रामस्थ ,नागरिकांच्या, युवकांच्या समस्या सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.त्यानुषंगाने जिल्हाध्यक्ष प्रा .सुरेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली दि .९ रोजी दत्त मंदिर येथे बैठक आयोजन करण्यात आली होती .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सबंध महाराष्ट्रभर पक्षाच्या लोकप्रतिनिधी ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी युवक व नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी व एक समृद्ध ,प्रगल्भ ,सर्वसमावेशक पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते तयार करण्यासाठी महिन्याच्या प्रत्येक पहिल्या शनिवारी गावात उपस्थित राहून बैठका घेऊन गावातील समस्या सोडवण्याचे आदेश राष्ट्रवादी अध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहेत . त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली बलसुर येथील दत्त मंदिरात ग्रामस्थ ,नागरिक व युवकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. गावातील विविध समस्या श्री .बिराजदार यांच्या समोर ग्रामस्थांनी मांडल्या . बलसुर येथील दारूबंदीसाठी समीती स्थापण करण्यात आली ,पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते , तांड्याला 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी लोकवटा जमा करणे, गावातील विविध योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली .

यावेळी बोलताना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रदेश राष्ट्रवादीच्या आदेशानुसार महिन्याच्या प्रत्येक शनिवारी आपापल्या गावात बैठका आयोजित करून गावातील समस्यांवर चर्चा करून त्यातून मार्ग काढत आपल्या गावाची विकासाच्या दिशेने वाटचाल करावी . कार्यकर्त्यांनी प्रथम आपल्या गावा पासूनच राष्ट्रवादी विचार पेरायला सुरवात करूण जातीयवादी विचारांना शह देत विकासाभीमुख पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते तयार करावेत . तसेच युवकांनी गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावे असे आवाहन प्रा .बिराजदार यांनी व्यक्त केले . या बैठकीसाठी सरपंच सौ. जयश्री माधव नांगरे,उपसरपंच सुरेश वाकडे, चेअरमन दिगंबर औरादे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील, उपाध्यक्ष सत्यनारायण जाधव,ग्रामपंचायत सदस्य आयुब पटेल,दत्तू बनसोडे,पवन पाटील, वाघंबर सरवदे , किसन चव्हाण, ग्रामसेवक एस .एस.पांढरे ,दत्तू चव्हाण ,साखरे ,बाळासाहेब बिराजदार, रमेश बिराजदार, सतीश वाकडे, उमाकांत सूर्यवंशी, अरुण पाटील, माधव कांबळे, इंद्रजित घोडके, माधव नांगरे, अतुल हिंगमीरे, वामन राठोड,विशाल पाटील, सुधीर नांगरे, बालाजी साखरे, गुलाब चव्हाण यांच्यासह गावातील मंडळी उपस्थित होते .