छत्तीसगडमधील कॉमेडियन देवराज पटेल यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. देवराज हा कॉमेडी व्हिडिओ शूट करण्यासाठी जात असताना ट्रकने त्याला धडक दिली. ‘दिल से बूरा लगता है’ या डायलॉगने पटेल देशभरात प्रसिद्ध झाले होते. त्यांचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.