गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात आज पाच सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंती दिनानिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात शिक्षक व कर्मचारी वर्गाने डायरी व भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला शिक्षकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे प्राचार्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केले समाज सुधारण्याकरिता शिक्षकांचे योगदान खूप आहे आज शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र अजूनही सतत सुरू आहे विद्यार्थी जर शिक्षकां पर्यंत येवू शकत नसतील तर आपण त्यांच्यापर्यंत कसे जाता येईल याचा पर्याय शोधून ऑनलाईन शिक्षणाचा आधार घेत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर जाऊ दिले नाही आहे असे प्रतिपादन प्राचार्य संजीव गोसावी यांनी केले प्रसंगी विद्यालयाचे उपप्राचार्य ओम प्रकाश संग्रामे पर्यवेक्षक अजय वानखेडे सैनिकी निदेशक वंजारी प्राध्यापक राकेश चडगुलवार व योगेश आसमवार यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ओम प्रकाश संग्रामे पर्यवेक्षक अजय वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन रहीम पटेल यांनी तर आभार शहीद शेख यांनी मानले कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *